Anand Kurapati Struggle Story: सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील “कौन बनेगा करोडपती” (Kaun Banega Crorepati) मध्ये हॉट सीटवर येणाऱ्या स्पर्धकांची कहाणी कायम प्रेरणादायक असते. ती त्यांच्या संघर्षाची, आकांक्षांची आणि स्वप्नपूर्तीसाठी केलेल्या परिश्रमाची कहाणी असते. (KBC ) चाहत्यांना हे स्पर्धक भारताचे अस्सल प्रतिनिधी वाटत असतात. या शो ने आपल्या १५ व्या सत्रामध्ये समस्त देशात वाहात असलेल्या ‘बदलावा’च्या लहरीचे स्वागत केले आहे. यांचे प्रतिबिंब हॉटसीटवर बसणाऱ्या स्पर्धकांमध्ये देखील दिसते आहे.
ज्ञानाच्या शक्तीने आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची आशा उराशी घेऊन हे स्पर्धक कायम येत असतात. हॉटसीट वर पोहोचलेल्या, सोलापूरच्या आनंद राजू कुरापती (Anand Kurapati ) या तरुणाची मासिक मिळकत केवळ 8-10 हजार आहे. परंतु “कौन बनेगा करोडपती” मध्ये त्याने साडे बारा लाख जिंकले आहेत. आपल्या ज्ञानाच्या बळावर शिकून स्वतःला सुसज्ज करण्याच्या त्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीमुळे हे शक्य होऊ शकले आहे. अत्यंत समर्पित आणि कर्तव्यदक्ष मुलगा म्हणून आपल्या वडिलांचा पॅरलिसिस बरा करण्याचे आणि आपल्या कुटुंबाला गरीबीमधून बाहेर काढण्याचे स्वप्न त्याने पहिले होते.
सिम्बायोसिस पुणे येथे शिकत असलेल्या आनंदला पुढे UPSC इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस / इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस परीक्षा देऊन विशेष प्राविण्य मिळवून इंडियन स्टॅटिस्टिकल ऑफिसर बनण्याची मोठी इच्छा आहे. आनंदच्या बालपणीच्या हलाखीचे वर्णन ऐकून अभिनेते बिग बी देखील अगदी हेलावून गेल्याचे बघायला मिळणार आहे. आर्थिक टंचाईमुळे आनंदला लहानपणी कुटुंबाची अंगावर जबाबदारी घ्यावी लागली, तसेच वडिलांची प्रकृती देखील ढासळत चालली होती.
Dream Girl 2: आयुष्मानच्या ‘ड्रीम गर्ल २’ची बॉक्स ऑफिसवर जादू; कमावले इतके कोटी
त्याची आई कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी विडी वळण्याचे काम करत आहे. आनंदने शिवणकाम करत एका पॅन्टसाठी 8 रुपयेप्रमाणे कमवून उदरनिर्वाह सुरु केला. आकर्षक खेळ खेळल्यावर आनंद जेव्हा हॉटसीट सोडून गेला, तेव्हा तो केवळ साडे बारा लाख रुपये जिंकला नाही, तर आयुष्यातला पहिला चेक (3.20 लाख रु.) स्वतःसोबत घरी घेऊन गेल्याचे बघायला मिळणार आहे.
तसेच कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी होण्याबद्दल आणि त्याच्या यशाबद्दल आनंद सांगितले आहे की, “माझ्या कुटुंबाला असा आनंद मिळाला आहे, जो त्याने आजवर कधीच अनुभवला नाही. कष्ट तर कायमच आमचे सोबती होते. बक्षिसाच्या रकमेचा मला माझ्या कुटुंबाला हातभार लावण्यास आणि माझ्या शिक्षणासाठी उपयोग होणार आहे. माझी क्षमता दाखवण्याची ही संधी मला दिल्याबद्दल मी कौन बनेगा करोडपतीचा ऋणी आहे. बिग बी यांनी दाखवलेला दयाळूपणा आणि सहानुभूती माझ्यासाठी खूप अनमोल आहे. अशी इच्छा व्यक्त केली आहे.