Dream Girl 2: आयुष्मानच्या ‘ड्रीम गर्ल २’ची बॉक्स ऑफिसवर जादू; कमावले इतके कोटी

  • Written By: Published:
Dream Girl 2

Box Office Collection: २०२३ मधील टॉप ५ ओपनिंग डे सिनेमाच्या यादीत ‘ड्रीम गर्ल २’ (Dream Girl 2) ने अनोखे स्थान पटकावले आहे. शुक्रवारी बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिकेत असणारा ‘ड्रीम गर्ल २’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. (Box Office Collection) सिनेमाला चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. २०२३ मधील टॉप ५ ओपनिंग डे सिनेमाच्या यादीत ड्रीम गर्ल २’ ने स्थान पटकावले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २५ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल २’ सिनेमाने पहिल्या दिवशी ९.७ कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. सिनेमाचे बजेट हे ३५ कोटी रुपये आहे. यामुळे सिनेमाने पहिल्या दिवशी जोरदार कमाई केल्याचे समोर आले आहे. याअगोदर प्रदर्शित झालेल्या कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीच्या सिनेमा ‘सत्य प्रेम की कथा’ यापेक्षा ड्रीम गर्ल २ ने जोरदार कमाई केल्याचे बघायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


२०२३ हे वर्ष बॉलिवूडसाठी खूप चांगले दिवस ठरले आहेत. वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या सिनेमांनी इतिहास रचला होता. आता ओपनिंग डेला कोणत्या सिनेमांनी जोरदार कमाई केली. पठाण- ५७ कोटी रुपये, गदर २- ४०.१० कोटी, आदिपुरुष- ३६ कोटी रुपये, किसी का भाई किसी की जान- १५.८१ कोटी, तू झूठी मैं मक्कार- १५.७३ कोटीचा गल्ला केल्याचे बघायला मिळालं आहे.

Subhedar Review: गनिमा कावा करणाऱ्यांकडून आत्मविश्वास शिकवणारा ‘सुभेदार’

ड्रीम गर्ल २ या सिनेमाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. पहिल्या भागाचे दिग्दर्शन देखील त्यांनीच केले होते. आता ‘ड्रीम गर्ल २’ सिनेमात आयुषमान खुराना आणि अनन्या पांडे यांच्याबरोबर अभिषेक बॅनर्जी, मनजोत सिंह, परेश रावल, अनु कपूर, विजय राज, सीमा पहवा, मनोज जोशी आणि रंजन राज अहम हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Tags

follow us