Keerthy Suresh: तोपर्यंत शांत बसा…! लग्नाच्या चर्चांवर दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशने सोडलं मौन

Keerthy Suresh Wedding Rumours : दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश (Keerthy Suresh) सध्या जोरदार चर्चेत आहे. अभिनेत्री लग्नबंधनामध्ये अडकणार असल्याची मोठी चर्चा रंगत आहे. उद्योगपती फरहान बिन लियाकतबरोबर किर्ती लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. पण आता अभिनेत्रीने या चर्चांवर मौन सोडले आहे. तिने ट्वीट करत चाहत्यांना शांत बसण्याचा सल्ला दिला आहे. Hahaha!! Didn’t have […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 23T124518.828

Keerthy Suresh

Keerthy Suresh Wedding Rumours : दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश (Keerthy Suresh) सध्या जोरदार चर्चेत आहे. अभिनेत्री लग्नबंधनामध्ये अडकणार असल्याची मोठी चर्चा रंगत आहे. उद्योगपती फरहान बिन लियाकतबरोबर किर्ती लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. पण आता अभिनेत्रीने या चर्चांवर मौन सोडले आहे. तिने ट्वीट करत चाहत्यांना शांत बसण्याचा सल्ला दिला आहे.

अभिनेत्री किर्ती सुरेश आणि उद्योगपती फरहान बिन लियाकत गेल्या काही दिवासांपासून रिलेशनमध्ये आहेत. आता ते लग्नबंधनात अडकणार असल्याची मोठी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. तसेच दोघांच्याही घरी लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाल्याचे देखील सांगितले जात आहे. पण आता या सर्व चर्चांवर अभिनेत्रीने मौन सोडलं आहे.


किर्तीने ट्वीट केलं आहे की, “हाहाहा! असं काही नाही आहे…माझ्यासोबत माझ्या मित्राचं नाव उगाचं जोडणं चुकीचं आहे… ज्यावेळी मी लग्न करणार आहे, त्यावेळी होणाऱ्या नवऱ्याबद्दल तुम्हाला नक्की माहिती देईल. पण तोपर्यंत शांत राहा”. किर्ती सुरेशचं हे ट्वीट सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

किर्ती सुरेशचे सुपरहिट सिनेमे .. (Keerthy Suresh Movies)

किर्ती सुरेशला ‘दसरा’ (Dasara) या सिनेमामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. या सिनेमामध्ये ती मुख्य भूमिकेमध्ये दिसून आली आहे. दाक्षिणात्य अभिनेता नानीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसली होती. या सिनेमाच्या शूटिंगच्या शेवटी किर्तीने सेटवरील सर्वांना सोन्याचे नाणे भेट म्हणून दिले होते. या नाण्यांची किंमत 70 लाख रुपये होती. किर्तीचा ‘मामन्न’ (Maamannan) हा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

तसेच तिच्या आगामी ‘भोलाशंकर’ या सिनेमाची देखील चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. या सिनेमात ती चिरंजीवीच्या बहिणीच्या भूमिकेत शिवून येणार आहे. हा सिनेमा 11 ऑगस्टला चाहत्यांना भेटीला येणार आहे. ‘सायरन’, र’घु थाथा’ आणि ‘रिवॉल्वर रीटा’ हे किर्तीचे आगामी सिनेमे आहेत. किर्ती सुरेशला अल्पावधीतच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा प्रमाणात चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

The Kerala Story ची कोटी-कोटी उड्डाणे : बॉक्स ऑफिसवर रचला नवा इतिहास

कोण आहे किर्ती सुरेश?

किर्ती सुरेश ही अभिनेत्री दाक्षिणात्य इंडस्ट्रीत अतिशय प्रसिद्ध असून तिने तेलगू, तमीळ आणि मल्याळम या तिन्ही भाषांमध्ये काम केले आहे. तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या अभिनयाचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याची आणि फॅशन सेन्सची नेहमीच चर्चा केली जाते.

किर्ती तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर तिचे नेहमीच फोटो पोस्ट करत असते. त्यातील किर्तीचे अनेक फोटो हे आपल्याला भारतीय पेहरावात पाहायला मिळतात. वेस्टर्न कपड्यांमध्ये तिचे खूपच कमी फोटो सोशल मीडियावर दिसून येतात. तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर ३३ लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात.

 

Exit mobile version