Download App

‘Khatron Ke Khiladi 14’ मध्ये कृष्णा श्रॉफ अंतिम फेरीत सहभागी होणारी एकमेव महिला स्पर्धक

Khatron Ke Khiladi 14 : 'खतरों के खिलाडी 14' मध्ये (Khatron Ke Khiladi 14) कृष्णा श्रॉफने (Krishna Shroff) फायनलसाठी तिचे स्थान निश्चित

  • Written By: Last Updated:

Khatron Ke Khiladi 14 : ‘खतरों के खिलाडी 14’ मध्ये (Khatron Ke Khiladi 14) कृष्णा श्रॉफने (Krishna Shroff) फायनलसाठी तिचे स्थान निश्चित केले आहे. तिच्या आतापर्यंतच्या प्रवासात कृष्णाने शोमध्ये तिच्या दृढनिश्चयाने आणि लवचिकतेने सर्वांना प्रभावित केले आहे.

लास्ट वीकेंडच्या एपिसोडमध्ये, ती तिकीट टू फिनाले जिंकू शकली नव्हती मात्र तिने तिच्या भीतीवर मात करून टॉप 5 मध्ये स्थान मिळवण्याचा ध्येय पूर्ण केला आहे. तिने गर्ल पॉवरचे प्रतिनिधित्व केले आहे कारण या हंगामात अंतिम फेरी गाठणारी ती एकमेव मुलगी आहे.

शनिवारच्या एपिसोडमध्ये कृष्णा श्रॉफला अभिषेक कुमारसोबत इतर दोन मजबूत खिलाड्यांच्या विरुद्ध स्टंटसाठी जोडीदार बनवले होते. ध्वजांची देवाणघेवाण आणि जोडण्यासाठी वेगवान बोटीला जोडलेल्या पाच फ्लोट्सवर उडी मारणे हे स्टंट होते. स्टंटच्या अगदी सुरुवातीलाच, अभिषेक घसरला आणि पाण्यात पडला त्यामुळे कृष्णाला एक अत्यंत शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक स्टंट सोलो करायला लागले.

या स्टंटने तिची “कधीही हार मानू नका” ही वृत्ती दाखवली, ज्याने तिच्या सह-स्पर्धकांकडून तसेच प्रेक्षकांकडून खूप टाळ्या मिळवल्या. तिने पाण्यात पडण्यापूर्वी दोन झेंडे गोळा केले होते तर दुसरी जोडी चार झेंडे जमा करून या स्टंटमध्ये जिंकली. या स्टंट पराभव झाल्यानंतर देखील रोहित शेट्टीने तिच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि ती एकटी असतानाही तिने इतर संघापेक्षा खूप वेगाने झेंडे गोळा केले असल्याचे नमूद केले. कृष्णाचा निर्धार स्पष्ट होता, आणि आगामी स्टंटमध्ये ती आणखी मजबूत लढायला तयार होती.

तर रविवारच्या एपिसोडमध्ये कृष्णाला इलेक्ट्रिक शॉकचा सामना करावा लागला ज्यामुळे सुरुवातीला ती घाबरली. तिला या स्टंटची भीती असतानाही तिने हे स्टंट पुढे सुरु ठेवले आणि स्वतःला एलिमिनेशनपासून वाचवले आणि इतर तीन मजबूत दावेदारांमध्ये दुसरे स्थान मिळवले. तर टॉप 5 मध्ये स्थान मिळवण्यासाठी तिला पाण्यात स्टंट करावे लागले. या स्टंटमध्ये पाण्याखालील बोगद्यातून पोहणे आवश्यक होते, जेथे शेवटच्या बिंदूकडे जाणाऱ्या भागांना अनलॉक करण्यासाठी चाव्या ठेवल्या होत्या. अपेक्षेप्रमाणे स्टंटमध्ये तिने जबरदस्त कामगिरी करत हा स्टंट 1 मिनिट 53 सेकंदात पूर्ण केला आणि टॉप 5 मधील एकमेव महिला ठरली.

शिंदेने बंदूक हिसकावली अन् पोलिसांनी तीन गोळ्या झाडल्या, कसं झालं बदलापूर आरोपीचं एन्काऊंटर?

तिच्या प्रतिस्पर्ध्याने हा स्टंट 4 मिनिटे 52 सेकंदमध्ये पूर्ण केला होता. कृष्णा या शो व्यतिरिक्त MMA मॅट्रिक्स जिम फ्रँचायझीचा विस्तार करण्यावरही लक्ष केंद्रित करत आहे. माहितीनुसार ती मुंबईतील फ्लॅगशिप जिमनंतर पुणे, पठाणकोट, लखनौ, सोलापूर आणि कोलकाता या शहरांमध्ये ही फ्रँचायझी वाढवणार आहे.

follow us