शिंदेने बंदूक हिसकावली अन् पोलिसांनी तीन गोळ्या झाडल्या, कसं झालं बदलापूर आरोपीचं एन्काऊंटर?

  • Written By: Published:
शिंदेने बंदूक हिसकावली अन् पोलिसांनी तीन गोळ्या झाडल्या, कसं झालं बदलापूर आरोपीचं एन्काऊंटर?

Badlapur Encounter: बदलापूरच्या एका नामांकित शाळेत (Badlapur Case) दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) एन्काऊंटर (Badlapur Encounter) झालाय. शिंदे याचे इन्काउंटर कसे झाले हे आता समोर आले आहे.

सोमवारी संध्यकाळी साडे पाचच्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत होते. मात्र मुंब्रा बायपास येथे अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर 2 गोळ्या झाडले तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर तीन गोळ्या झाडल्या अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे गंभीर जखमी झाले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे.  सध्या या प्रकरणावरून राज्य सरकारवर विरोधक जोरदार टीका करत असून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.

तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहे. अक्षय शिंदेच्या पत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. त्याची चौकशीसाठी आरोपीला नेण्यात येत होते मात्र मुंब्रा बायपास येथे अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडले त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर गोळ्या झाडले अशी माहिती माध्यमांशी बोलताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच विरोध प्रत्येक गोष्टींवर प्रश्न उपस्थित करतो असेही ते म्हणाले.

प्रकरण काय

बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती. आरोपीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती.

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

या घटनेचा तपास करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. या प्रकरणात बदलापुर पुर्व पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 65(2),74,75,76 सह पोक्सो कायदा कलम 4 (2),8, 10 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube