Download App

Khichdi 2 Teaser: दिवाळीत फुटणार हास्याचे फटाके, ‘खिचडी 2’ चा टीझर प्रदर्शित 

Khichdi 2 Teaser: खिचडी सिरीयलने (Khichdi serial) प्रेक्षकांना चांगलच खळखळून हसवलं होत. ही सिरीयल आज देखील अनेकजण पुन्हा पुन्हा बघत असल्याचे बघायला मिळत असते. (Khichdi 2 Teaser) या सिरीयलमधील अनेक कलाकारांची व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांना कायम खळखळून हसवलं आहे. या सिरियलमधील कॉमेडी (Comedy) संवाद देखील चाहत्यांना एकदम भारी वाटते.

गेल्या काही वर्षांपूर्वी देखील खिचडी हा सिनेमा आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (box office) जलवा बघायला मिळाला होता. आता खिचडीचा पुढचा भाग म्हणजे ‘खिचडी 2’ चा देखील टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये पारेख परिवार पुन्हा एकदा एका मिशनवर जात असल्याचे दिसत आहेत. पारेख परिवारातील हंसा, जयश्री, प्रफुल्ल, बाबूजी असे सर्व सदस्य या मिशनसाठी एकत्र गेल्याचे बघायला मिळणार आहे.

या मिशनमध्ये त्यांच्यासोबत स्कॅम १९९२ फेम अभिनेता प्रतीक गांधी देखील हटक्या भूमिकेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच खिचडी सिनेमाच्या पहिल्या भागाप्रमाणे याही भागामध्ये देखील फराह खान झळकणार असल्याचे दिसत आहे. खिचडी सिनेमा यंदाच्या दिवाळीमध्ये म्हणजेच १७ नोव्हेंबर दिवशी संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे.

Mumbai Diaries 2 Trailer: अंगावर शहारा आणणारा ‘मुंबई डायरीज २’चा ट्रेलर आउट

या सिनेमामध्ये सुप्रिया पाठक, किर्ती कुल्हारी, वंदना पाठक, राजीव मेहता, अनंग देसाई, जमनादास मजेठिया हे कलाकार झळकणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच प्रतीक गांधी, किकू शारदा, फराह खान हे कलाकार मुख्य भुमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. खिचडी २ मध्ये पुन्हा एकदा कॉमेडीचा तडका बघायला मिळणार आहे.

Tags

follow us