Mumbai Diaries 2 Trailer: अंगावर शहारा आणणारा ‘मुंबई डायरीज २’चा ट्रेलर आउट 

Mumbai Diaries 2 Trailer: अंगावर शहारा आणणारा ‘मुंबई डायरीज २’चा ट्रेलर आउट 

Mumbai Diaries 2 Trailer: बहुचर्चित ‘मुंबई डायरीज’ (Mumbai Diaries 2) या वेबसीरीजच्या पहिल्या भागाला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘मुंबई डायरीज’च्या या यशानंतर लवकरच चाहत्यांच्या भेटीला (Bollywood) पुन्हा एकदा मुंबई डायरीजचा आगामी सीझन येत असल्याचे बघायला मिळत आहे. याची एक झलक सध्या सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली होती.

या वेबसीरीजची घोषणा केल्यानंतर चाहत्यांना मोठी उत्सुकता लागल्याचे बघायला मिळत आहे. अखेर या वेबसीरीजचा आज ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मेडिकल ड्रामा असलेल्या या वेबसीरिजच्या ट्रेलरमध्ये आपल्याला मुंबईतील बॉम्बे जनरल हॉस्पिटलचे कर्मचारी कोण कोणत्या आव्हानांना सामोरे जाणार आहेत, (Web Series)हे आपल्याला ट्रेलरमधून बघायला मिळणार आहे.

निखिल अडवाणी दिग्दर्शित या वेबसीरीजच्या पहिल्या सीझनला चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाला होता. आणि आता दुसऱ्या सीझनमध्ये चाहत्यांना मुंबई शहराला हानी पोहचवणाऱ्या पुराची रंजक अशी कथा बघायला मिळणार आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्यावर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यातील काही समस्या नातेसंबंध आणि काही जणांचे भवितव्य उद्ध्वस्त करणारे बघायला मिळाले आहे. त्या डॉक्टरांनी नेमकं कशाप्रकारे सर्वस्वपणाला लावत लोकांचे प्राण वाचवले आहे. हे या ट्रेलरमधून बघायला मिळाले आहे.

Aranmanai: तमन्ना भाटियाने ‘अरनमानाई 4’ च्या फर्स्ट लूकने प्रेक्षकांचं वेधलं लक्ष

मुंबई डायरीज २ मध्ये मुख्य भूमिकेत मोहित रैनासह कोंकणा सेन, टीना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावाडी हटके कलाकार दिसणार आहे. (Entertainment News) या सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्मिती निखिल अडवाणी यांनी धुरा सांभाळली आहे. येत्या ६ ऑक्टोबर दिवशी ही वेबसीरीज ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube