Download App

Kiara and Sidharth Wedding:कियाराला लागणार सिद्धार्थच्या नावाची मेहंदी, ईशा अंबानी असेल खास पाहुणी

  • Written By: Last Updated:

 

जैसलमेर: बॉलिवूडचे लव्ह बर्ड सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. कियारा आणि सिद्धार्थ ६ फेब्रुवारीला राजस्थानच्या जैसलमेरमध्ये लग्न करणार आहेत. दोघांचे भव्य लग्न कुटुंब आणि जवळच्या मित्रांमध्ये पार पडणार आहे. आजपासून लग्नाच्या विधींना सुरुवात होत आहे. चला तर मग जाणून घेऊया कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नात काय खास असणार आहे.

हळद-मेहंदी कधी होणार

रविवारपासून कियारा आणि सिद्धार्थचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू होत आहेत. दिवसभरात गणेश स्थापना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर मेहंदी आणि हळदीचा विधी होईल. लग्नसमारंभासाठी अनेक विशेष तयारी करण्यात आली आहे. मेहंदी आणि हळदीनंतर संध्याकाळी एका भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी परफॉर्म करणार आहेत.

हळदी-मेहंदी विधीनंतर सोमवारी (६ फेब्रुवारी) कियारा आणि सिद्धार्थ जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये सात फेरे घेतील. लग्नानंतर ७ फेब्रुवारीला ग्रॅण्ड पार्टीही होणार आहे.

कियाराला वधू कोण बनवणार?

कियाराच्या ब्रायडल मेकअप आणि कॉस्च्युम डिझाइनसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. वेडिंग ड्रेससाठी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​आणि मेकअप आर्टिस्ट स्वर्णलेखा गुप्ता मेक-अपसाठी तिथे पोहोचल्या आहेत. कियाराचे हेअरस्टायलिस्ट अमित ठाकूर आणि बॉलीवूडची मेहंदी डिझाइन क्वीन वीणा नागडा देखील लग्नाच्या ठिकाणी पोहोचले आहेत. वेडिंग शूट कव्हर करण्यासाठी विशाल पंजाबी त्याच्या संपूर्ण टीमसह जैसलमेरला पोहोचला आहे.

हे सेलिब्रिटी लग्नात खास पाहुणे असतील

कियारा-सिद्धार्थच्या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्स जैसलमेरला पोहोचणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, करण जोहर, शाहिद कपूर, मीरा राजपूत, ईशा अंबानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी रविवारी रात्री 12 वाजता मुंबईहून येणाऱ्या चार्टर फ्लाइटमध्ये लग्नस्थळी पोहोचतील.

या व्यतिरिक्त आणखी एक चार्टर विमान आज रात्री ८ वाजता जैसलमेरला येत आहे, ज्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक नामांकित सेलिब्रिटी या भव्य लग्नाला हजेरी लावण्यासाठी येत आहेत. पाहुण्यांच्या यादीत अमिताभ बच्चन, विकी कौशल, कतरिना कैफ, सलमान खान यांच्या नावाचीही चर्चा आहे. वर राजा सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि वधू कियारा अडवाणी यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक शुक्रवारी जैसलमेरला पोहोचले आहेत.

कियारा आणि सिद्धार्थच्या हायप्रोफाईल लग्नातही सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे. शाहरुख खानचा एक्स बॉडीगार्ड यासिनला लग्नाच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. पाहुण्यांचे मोबाईल बाहेर जमा करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.

चाहते आता कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या पहिल्या फोटोंची वाट पाहत आहेत. कियाराला नववधूच्या जोडीमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. बाय द वे, कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नासाठी तुम्ही किती उत्सुक आहात?

Tags

follow us