Underworld Ka Kabzaa : बॉलिवुडकरांकडून ‘किच्चा सुदीपच्या’ अंडरवर्ल्ड का कब्जावर कौतुकाचा वर्षाव

मुंबई : आनंद पंडित यांचा ‘अंडरवर्ल्ड का कब्जा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानंतर फक्त प्रेक्षकच नाही तर अनेक बॉलिवूडकरांकडून ‘किच्चा सुदीपच्या’ अंडरवर्ल्ड का कब्जावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये आनंद पंडित यांच्या जगभरात 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या पहिल्या-वहिल्या चित्रपटाचा ट्रेलर […]

Under World Ka Kabza

Under World Ka Kabza

मुंबई : आनंद पंडित यांचा ‘अंडरवर्ल्ड का कब्जा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानंतर फक्त प्रेक्षकच नाही तर अनेक बॉलिवूडकरांकडून ‘किच्चा सुदीपच्या’ अंडरवर्ल्ड का कब्जावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

यामध्ये आनंद पंडित यांच्या जगभरात 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या पहिल्या-वहिल्या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडीयावर शेअर करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. अजय देवगणपासून दिग्ददर्शक राकेश रोशन, मधुर भांडारकरपर्यंत सर्वांचा यामध्ये समावेश आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज आहे. प्रेक्षकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये सुपरस्टार उपेंद्र, किच्चा सुदीपा आणि श्रिया सरन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील अभिनेत्री श्रिया सरन ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे ती दृश्यम 2 या चित्रपटामुळे. या चित्रपटाने चांगलं यश मिळवलं आहे. त्यांनंतर आता तिचा दुसरा चित्रपट आहे.

Upcoming Movie : ‘अंडरवर्ल्ड का कब्जा’ मधील ‘नमामी नमामी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटाची निर्मिती श्री सिद्धेश्वरा एंटरप्राइजेज आणि अलंकार पांडियनच्या सहाय्याने आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. तर आर. चंद्रू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘अंडरवर्ल्ड का कब्जा’ हा चित्रपट 17 मार्च, 2023 ला कन्नड, हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळममध्ये रिलीज होणार आहे.

Exit mobile version