Upcoming Movie : ‘अंडरवर्ल्ड का कब्जा’ मधील ‘नमामी नमामी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Untitled Design   2023 02 17T123612.517

मुंबई : आनंद पंडित यांचा ‘अंडरवर्ल्ड का कब्जा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटातील आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. ‘नमामी नमामी’ असं या गाण्याचं नाव असून यामध्ये अभिनेत्री श्रिया सरनवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. हे एक धार्मिक गाणं आहे. जे शिवपूजा कशी करावी हे दाखवते. हे गाणं ऐश्वर्या रंगराजनने गायलेले आहे. दीपक भारती यांनी लिहिले असून संगीत दिग्दर्शन रवी बसरूर यांनी केले आहे.

जय भीम फेम सूर्या अन् सचिन तेंडुलकरची ग्रेट भेट, सोशल मीडियावर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज आहे. प्रेक्षकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये सुपरस्टार उपेंद्र, किच्चा सुदीपा आणि श्रिया सरन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.या चित्रपटातील अभिनेत्री श्रिया सरन ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे ती दृश्यम 2 या चित्रपटामुळे. या चित्रपटाने चांगलं यश मिळवलं आहे. त्यांनंतर आता तिचा दुसरा चित्रपट आहे.

गेल्या काही दिवसांरपूर्वी या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालं. देखो आया धुरंधरा अस या गाण्याचं नाव असून हे गाणं स्निग्धजीत भौमिक आमि श्रुतिका समुद्रला यांनी गायलं आहे. स्निग्धजीत भौमिक यांनी विक्रम वेधाचं ट्रॅक ‘अल्कोहल’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर श्रुतिका समुद्रला ‘सा अरे गा मा पा 14′ ची विजेती होती.

या गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांनी लिहिले आहे तर संगीत रवि बसरूर यांनी दिले आहे. चित्रपटाची निर्मीती श्री सिद्धेश्वरा एंटरप्राइजेज आणि अलंकार पांडियनच्या सहाय्याने आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. तर आर. चंद्रू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘अंडरवर्ल्ड का कब्जा’ हा चित्रपट 17 मार्च, 2023 ला कन्नड, हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळममध्ये रिलीज होणार आहे.

Tags

follow us