Download App

Jawan: किंग खानच्या ‘जवान’मधील डायलॉगवरुन नवा वाद पेटला; करणी सेनेने दाखल केली तक्रार

Jawaan: किंग खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘जवान’ सिनेमाचा येत्या ७ सप्टेंबर दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. जानेवारीमध्ये ‘पठाण’ (Pathan) सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच ‘जवान’ची जोरदार चर्चा रंगली होती. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते ‘जवान’ची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहे. परंतु आता या सिनेमातील (Controversy Dialogue) एका डायलॉगमुळे नवा वाद पेटल्याचा बघायला मिळत आहे. या डॉयलॉगवरुन करणी सेनेने सिनेमाविरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे.


जवान सिनेमात एक डायलॉग आहे. ‘एक राजा था, एक के बाद एक जंग हारता गया, भूखा प्यासा घूम रहा था जंगल में, बहुत गुस्से में था.’ करणी सेनेने सिनेमाच्या निर्मात्यांना हा डायलॉग काढून टाकण्याचा इशारा यावेळी दिला आहे. महाराणा प्रताप यांचा अशा प्रकारे अपमान केल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो, असा इशारा करणी सेनेचे अध्यक्ष सुरजीत सिंह राठोड यांनी सिनेमाच्या निर्मात्यांना यावेळी दिला आहे.

किंग खान या सिनेमातून लोकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करत आहे. करणी सेनेचे अध्यक्ष सुरजित सिंह राठोड यांनी सांगितलेल्या माहितीनुसार की, या संवादाबद्दल मी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसे झाले नाही तर महाराणा प्रताप यांनी अकबराचे त्यावेळी काय केले होते. तो प्रकार पुन्हा घडू नये, अशी आमची इच्छा आहे. म्हणूनच हा संवाद या सिनेमातून त्वरित काढून टाकला पाहिजे, असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

Kiran Mane: किरण मानेंकडून किंग खानचं तोंडभरुन कौतुक; म्हणाला, “अख्ख्या देशानं घरात…”

‘जवान’ सिनेमा ७ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमात किंग खानच्या जोडीला साऊथची तगडी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. यामध्ये किंग खानसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारत असल्याचे बघायला मिळणार आहे. हिंदीसोबतच हा सिनेमा तमिळ, तेलगु भाषांमध्ये देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज