Nick Jonas-King च्या रीमिक्स गाण्याची धमाल, अल्पावधित मिलियन्समध्ये व्हूज

King x Nick Jonas – Maan Meri Jaan : हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनस हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मिडीयावर चर्चेच असतो. यावेळी त्याची चर्चा झाली आहे. कारण त्याने भारतीय रॅप गायक किंग सोबत रिमिक्स गाणे गायले आहे. अल्पावधित या गाण्याला मिलियन्समध्ये व्हूज मिळाले आहेत. मान मेरी […]

Nick Jonas King

Nick Jonas King

King x Nick Jonas – Maan Meri Jaan : हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनस हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मिडीयावर चर्चेच असतो. यावेळी त्याची चर्चा झाली आहे. कारण त्याने भारतीय रॅप गायक किंग सोबत रिमिक्स गाणे गायले आहे. अल्पावधित या गाण्याला मिलियन्समध्ये व्हूज मिळाले आहेत.

मान मेरी जान या गाण्याचं रिमिक्स त्यांनी केलं आहे. निकने गायलेलं हे पहिलं हिंदी गाणं आहे. तर निक ने केलेलं हे कोलॅबरेशन देखील पहिलंच आहे. नुकतच हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.त्याच्या या गाण्याला भारतीय चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. निकने देखील आता पत्नी प्रियांकाच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने देखील लग्नाच्या आधीपासूनच बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू केली आहे. तसेच आता हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनस याने ही अमेरिके शिवाय भारतातही आपल्या आवाजाची जादू करायला सुरूवात केली आहे.

…म्हणून प्रशांत दामले म्हणतात, बस अजून काय हवंय आयुष्या

दरम्यान निक जोनस याने या गाण्याची व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना निकने कॅप्शन दिले की, ‘कोणी नाही पण मी आणि तुम्ही आतापासून जीवनाच्या शेवटापर्यंत… मान मेरी जानचा व्हिडीओ आला आहे. त्या प्रेम द्या.’

Exit mobile version