…म्हणून प्रशांत दामले म्हणतात, बस अजून काय हवंय आयुष्यात

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 24T162908.922

Prashant Damle On Master Dinanath Mangeshkar Award : सोमवारी मुंबईत पष्णमुखानंद सभागृहात दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर 81 व्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अनेक कलाकरांना ‘मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार’ आणि ‘मास्टर दीनानाथ विशेष वैयक्तिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यामध्ये मराठी अभिनेते प्रशांत दामले यांना देखील नाटक क्षेत्रात समर्पित सेवेसाठी ‘मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार’ देण्यात आला.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर प्रशांत दामले यांनी एक फेसबुक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये प्रशांत दामले म्हणतात, मा ‘दिनानाथ मंगेशकर पुरस्कार… आणि लहानपणी कानावर ज्यांचे संस्कार झाले ते पं हृदयनाथ मंगेशकर आणि माझ आवडते व्यक्तिमत्व आशाताई ह्याचे आशीर्वाद. त्यांनी उत्साहाने सेल्फी पण काढली. बास अजून काय हवय आयुष्यात’

Prashant Damle On Master Dinanath Mangeshkar Award

पुढे त्यांनी सध्या त्यांच्या सुरू असलेल्या नियम व अटी लागू या नाटका निमित्तच्या ‘पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याविषयी माहिती दिली आहे. नियम व अटी लागू पश्चिम महाराष्ट्र दौरा उद्या मंगळ २५ एप्रिल सं 7 वा शाहुकलामंदीर सातारा बुध २६ एप्रिल सं 7 वाजता भावे नाट्यगृह सांगली शुक्र २८ एप्रिल सं 7 वाजता केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर.’

नकार ते सुपरस्टार, स्ट्रगलनंतर ‘या’ गाण्याने मिळालं Arijit Sing ला स्टारडम

दरम्यान अभिनेते प्रशांत दामले यांची आजवर अनेक दर्जेदार नाटकं रंगभूमीवर येऊन गेली आहेत. त्यांच्या नाटकांना रसिक प्रेक्षकांनी भरुभरुन प्रतिसाद दिला आहे. आजही त्यांच्या नाटकांना प्रेक्षक भरभरुन प्रेम करत असतात. प्रशांत दामले यांनी काही महिन्यांपूर्वी साडे बारा हजार नाटक प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. एवढ्यावरच त्यांचा प्रवास थांबलेला नाही. त्यांनी आपले नाटकाचे प्रयोग सुरुच ठेवले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube