सरकारचा मोठा निर्णय! राजेश अग्रवाल राज्याचे मुख्य सचिव
मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या निवृत्तीला काही दिवस राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजेश अग्रवाल हे कार्यभार स्वीकारणार आहेत.
राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. (Maharashtra) केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेले वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश अग्रवाल यांची राज्याचे मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजेश अग्रवाल यांनी केंद्रीय पातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. पुढच्या दोन दिवसात त्यांनी कार्यभार स्वीकारावा, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.
राजेश अग्रवाल यांनी आयआयटी दिल्ली येथून बी.टेक पदवी प्राप्त केली. प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतरही त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर शासन व्यवस्थेत कसा प्रभावी ठरू शकतो, यावर सातत्याने काम केले. मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या निवृत्तीला काही दिवस राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजेश अग्रवाल हे कार्यभार स्वीकारणार आहेत. राजेश अग्रवाल यांनी केंद्रात सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयातील अपंग व्यक्ती विभागाचे सचिव होते. अग्रवाल हे १९८९ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
मोठी बातमी! पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच ! अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती
केंद्रात कार्यरत असताना अग्रवाल यांच्या आधार, जनधन, डिजिलॉकर या कामाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. तसेच सामाजिक न्याय उपक्रमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डिजिटल इंडिया मोहिमेला चालना देण्यात त्यांचा हातभार महत्त्वाचा मानला जातो. राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्तीपूर्वी ते भारत सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे (DEPwD) सचिव म्हणून कार्यरत होते.
दिव्यांग नागरिकांसाठी धोरणे आणि सुविधा प्रभावीपणे राबवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे व्यापक कौतुक झाले. डिसेंबर 2025 पासून राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. डिजिटल प्रशासन, पारदर्शकता आणि कार्यक्षम गव्हर्नन्समध्ये त्यांचा अनुभव राज्याच्या विकासयात्रेला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
