नकार ते सुपरस्टार, स्ट्रगलनंतर ‘या’ गाण्याने मिळालं Arijit Sing ला स्टारडम
Happy Birthday Arijit Sing : आजच्याच दिवशी 1987 ला पश्चिम बंगालमध्ये अरजित सिंगचा जन्म झाला. घरातच आई आणि आजीकडून अरजितला संगीतचं बाळकडू मिळालं. तर आजच्या घडीचा बॉलिवूडचा आघाडीचा आणि लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गायक म्हणजे अरजित सिंग. अरजित आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त जाणून घेऊ त्याच्या जीवन प्रवासाविषयी…
कोणे एके काळी अगदी नाकारण्यात आलेला अरजित सिंग आज तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मात्र या यशामागील काहाणी देखील तेवढीच खडतर आहे.अरजितचा सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
बॉलिवूडमध्ये करिअर सुरू करण्यापूर्वी अरजितने आपली सुरूवात केली ती गाण्याच्या रियालिटी शोपासून. त्यावेळी तो केवळ 18 वर्षांचा होता. 2005 मध्ये ‘गुरुकुल’ गाण्याच्या रियालिटी शोमध्ये त्याने प्रेक्षकांची मन जिंकत टॉप 5 पर्यंतचा टप्पा गाठला. मात्र ऑडियन्स पोलमध्ये तो शोमधून बाहेर पडला. अशाप्रकारे अरजितला करिअरच्या सुरूवातीलाच नकार मिळाला.
पण याचं कार्यक्रमात संजय लीला भन्साळींनी अरजितचं टॅलेंट ओळखलं. अरजितला पहिल गाणं मिळालं ते सावरिया चित्रपटातील यू शबनमी हे गाणं. मात्र हे गाणं काही कारणांमुळे रिलीजच झालं नाही. त्यानंतरही देखील त्याचा आणखी एक अल्बमही गुलदस्त्यातच राहिला. त्यानंतर मात्र आणखी एका गाण्याच्या रियालिटी शोमध्ये त्याने प्रेक्षकांची मन जिंकत मिळालेल्या बक्षिसातून त्याने थेट आपला म्युझिक स्टुडिओ सुरू केला. प्रसिद्ध संगीतकार प्रीतमसह म्युझिक प्रोड्यूसर आणि कम्पोझर म्हणून काम सुरू केलं.
यादरम्यान त्याने 2010 मध्ये ‘तोसे नैना’ हे गाणं गायलं. लोकांना त्याचा आवाज आवडला. त्यानंतर ‘कभी जो बादल बरसे’ हे गाणं तर सुपरहिट ठरलं. त्यानंतर एकसे एक हिट गाणे देण्याचा त्याचा हा सिलसिला आजही सुरूच आहे. आतापर्यंत त्याने तब्बल 200 हून अधिक गाणे गायले आहेत. सध्याच्या टॉप 5 गायकांमध्ये त्याची गणती केली जाते.
अरजितला आतापर्यंत 68 अॅवार्ड्स मिळाले आहेत. नुकतचं रणबीर कपूर आणि आलिया भट स्टारर ब्रह्मास्त्रच्या गाण्यांसाठी त्याच्या प्रचंड कौतुकाचा वर्षाव झाला. त्याने तेलुगू चित्रपटांसाठी ही गाणे गायले आहेत. त्याच्या काही प्रसिद्ध गाण्यांमध्ये राबता, उसका ही बनना, नशे सी चढ़ गई, आशिकी, कबीरा, इलाही या गाण्यांचा उल्लेख करता येतो.