Download App

Kiran Mane: ‘जरांगे पाटलांच्या धैर्याला सलाम’; किरण मानेंची मराठा आरक्षणाबद्दल खास पोस्ट

  • Written By: Last Updated:

Kiran Mane On Manoj Jarange Maratha Reservation : अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे काही दिवसांपासून किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहेत. किरण माने हे विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर (Social media) शेअर करतात. नुकतीच किरण माने यांनी फेसबुकवर मराठा आरक्षणाविषयी (Maratha Reservation) एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टनं सर्वांचे लक्ष वेधलं आहे.


किरण माने यांनी साताऱ्यातील मराठा आंदोलनकर्त्यांबरोबरचे फोटो शेअर करत लिहिलं आहे. सातार्‍यात सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू आहे. जरांगे पाटलांना सपोर्ट म्हणून. सगळ्या पाहुणेमंडळींबरोबर थोडा वेळ बसलो. त्यात कोडोलीतले ७५ वर्षांचे तात्या सावंत दोन दिवस झाले उपोषणाला बसलेत. त्यांना ‘तब्येतीची काळजी घ्या’ अशी विनवणी केली पण ऐकायला तयार नाहीत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता ‘करो या मरो’ या स्टेजवर आलाय. लढा द्यायलाच हवा, पण असे वयोवृद्ध लोक मैदानात उतरल्यामुळं त्यांच्या प्रकृतीची लै काळजी वाटायला लागलीय. आज एका तरण्याबांड भावानं आत्महत्या केली. चार दिवसांपूर्वी एकानं स्वत:ला संपवलं होतं. एकानं गाड्या फोडल्या… इतकं इमोशनल होऊन कसं चालंल माझ्या भावांनो !

Baba Maharaj Satarkar यांच वारकरी संप्रदायातील योगदान कसं आहे, पाहा व्हिडिओ | LetsUpp Marathi

आपली ताकद मोठी हाय. शांततेत काम केलं तरी पुरेसं हाय. वाघाच्या अस्तित्वात आणि डरकाळीत दहशत असते. समोरचा कितीबी माजलेला असला तरी एका डरकाळीत जाग्याव थरथरला पायजे. कशाला उतावीळ होऊन टोकाचे निर्णय घ्यायचे? जरांगे पाटलांच्या धैर्याला आणि चिकाटीला सलाम. यश मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाय आपला मराठा गडी, असा आत्तातरी पूर्ण विश्वास वाटतोय ! फक्त अशा आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता काही गोष्टींची काळजीही वाटते आहे. असो. आपण सध्या तरी फक्त ‘पाॅझीटिव्ह’ विचार करूया. जरांगे पाटलांच्या पाठीशी उभे रहाणं गरजेचं हाय.

Lalu Prasad Yadav Biopic: लालूप्रसाद यादव यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येणार; प्रकाश झा करणार निर्मिती

माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या रक्तात धैर्य, चिकाटी आणि हिंमत हाय ! योग्य ठिकानी, योग्य गोष्टीचा वापर करत पुढं जाऊया. उतावळेपना करायच्या आधी कुटूंबाचा विचार करा. आपन आपल्या समाजातल्या गोरगरीबांच्या पुढच्या पिढ्यांसाठी लढतोय. आरक्षण मिळणार… आपण मिळवणारच…कुनाचा बाप ते थांबवू शकत नाय !
जय जिजाऊ… जय शिवराय… जय भीम.

किरण मानेंची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. जय जिजाऊ जय शिवराय, जाहीर पाठिंबा सर, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, समाजाशी नाळ असलेले कलाकार…अभिमान आहे दादा, एक मराठा लाख मराठा, आत्महत्या करून कोणताही लढा देता येत नाही, त्यासाठी जगावं लागतं, अशा कमेंट्स किरण मानेंच्या पोस्टला सध्या मिळत आहेत.

Tags

follow us