Kiran Mane: “किशोर कदमनं माझ्या खिश्यात शंभर रुपये कोंबले…”, किरण मानेंना मिळाली ‘या’ अभिनेत्याकडून प्रेरणा

Kiran Mane Post : अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मिडीयावर (Social media) मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. सोशल मिडीयावरील त्यांच्या पोस्ट चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर किरण यांनी खास पोस्ट केली आहे. त्यांच्या स्ट्रगल काळात एका अभिनेत्याकडून कशी प्रेरणा मिळाली याबद्दल या पोस्टमध्ये लिहिले आहे. सत्ताविस वर्षांपूर्वीची आठवण सांगत या पोस्टची सुरुवात […]

Kiran Mane Post

Kiran Mane Post

Kiran Mane Post : अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मिडीयावर (Social media) मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. सोशल मिडीयावरील त्यांच्या पोस्ट चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर किरण यांनी खास पोस्ट केली आहे. त्यांच्या स्ट्रगल काळात एका अभिनेत्याकडून कशी प्रेरणा मिळाली याबद्दल या पोस्टमध्ये लिहिले आहे. सत्ताविस वर्षांपूर्वीची आठवण सांगत या पोस्टची सुरुवात केली. ज्यात किशोर कदम (Kishore Kadam) यांच्याविषयी लिहीले आहे. शिवाय ज्या अभिनेत्याच्या अभिनयाने किरण माने यांच्या मनावर कब्जा केला त्याबद्दलही लिहिले आहे.


किरण माने लिहितात की, “किरण्या, तिकीट का काढलंस? लै श्रीमंत झालास का?” असं म्हणत किशोर कदमनं माझ्या खिशात शंभर रूपये कोंबले… सत्तावीस वर्षांपूर्वी, ‘स्ट्रगल’च्या त्याकाळात, शंभर रूपये खूप मोठ्ठे होते माझ्यासाठी.. मला नाटकाची नाईट ऐंशी रूपये मिळत होती ! तरीही पृथ्वी थिएटरवर जाऊन एक हिंदी दीर्घांक पहाण्यासाठी मी तिकीट काढलंवतं…प्रयोग सुरू झाला.. आणि त्या अभिनेत्याचा भन्नाट परफाॅर्मन्स पाहून अक्षरश: खुर्चीला खिळून गेलो… तासाभराच्या त्या अद्भूत अभिनयाच्या आविष्कारानं मना-मेंदूवर कब्जा केला…
त्या दीर्घांकाचं नांव होतं ‘पियानो बिकाऊ है’ आणि तो अभिनेता होता सौरभ शुक्ला !…नंतर माझा मित्र प्रसाद वनारसे यानं त्याच दीर्घांकाचं मराठीकरण केलं-‘हॅलो’. अस्सल मराठमोळं वाटावं इतकं भन्नाट लिहीलंवतं त्यानं. ते स्क्रीप्ट मी घरी एकटाच वाचत बसायचो. घरातल्या घरात परफाॅर्मन्सही सुरू केले.. त्यानंतर हळूहळू या गोष्टीला पंधरा सोळा वर्ष उलटून गेली.तोपर्यन्त इकडे यथावकाश माझी व्यावसायिक नाटकातल्या करीयरची गाडी रूळावर आली होती. एक दिवस गडकरी रंगायतनमधल्या व्हिआयपी रूममध्ये लताबाईंना मी ‘हॅलो’चा परफाॅर्मन्स करुन दाखवला. त्यांना लैच आवडला. म्हणाल्या, “यावर तू दोन अंकी नाटक लिही. मी प्रोड्यूस करते.”

सातारला माझा दोस्त झाकीरच्या घरी राजीव मुळ्ये आणि मी, दोघांनी अनेक चर्चा करुन पंधरा दिवसांत दोन अंकी नाटक लिहीले. बघता-बघता ‘श्रीचिंतामणी’तर्फे हे नाटक रंगभुमीवर आलंही.. नाटकाचं नांव होतं ‘ती गेली तेव्हा’ !
अभिनेता म्हणून हे लै लै लैच मोठ्ठं चॅलेंज होतं… सव्वादोन तास पूर्णवेळ मी स्टेजवर – आठ वेगवेगळ्या भूमिका.. वेगळी बेअरिंग्ज,भिन्न आवाज.. एकही ‘ब्लॅकआऊट’ नाही… सगळा कस पणाला लावणारं नाटक. मध्येमध्ये चार-पाच पात्रंही पेरली होती. नाटक थोडं आडवळणाचं असल्यामुळं मीच दिग्दर्शन करायचं ठरवलं.. हिराॅईन योगिनी चौक होती. रोहीत चव्हाण, अजिंक्य ननावरे या सातार्‍यातल्या माझ्या ग्रुपमधल्या कलाकारांनाही मी संधी दिली.”

पडद्यावर उडणार रांगड्या बैलगाडा शर्यतीचा धुराळा

पुढे ते लिहीतात की, “या नाटकानं अभिनेता म्हणून माझा आत्मविश्वास एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला ! आज मागं वळून पहाताना जाणवतं.. एका अफलातून अभिनेत्याच्या परफाॅर्मन्सपासून मिळालेली प्रेरणा आपल्याला कुठून कुठपर्यन्त घेऊन जाते ! लब्यू सौरभजी.”

अभिनेते सौरभ शुक्ला यांच्या अभिनयाचा प्रभाव किरण मानेंवर पडला. त्यांच्या पियानो बिकाऊ है या हिंदी नाटकाच्या मराठी अनुवादीत नाटकात किरण मानेंनी काम केलं होतं. याविषयी खास पोस्ट करून सौरभ शुक्ला यांच्या नाटकाने किरण माने यांचा आत्मविश्वास कसा वाढवला याविषयी त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

Exit mobile version