Ram Shinde : राम शिंदे (Ram Shinde) यांची कुस्ती थोड्या वरून हुकली, थोडी कुस्ती राहिली होती. त्यांच्या विरोधात जिल्ह्यात काही शक्ती घुसू पाहत आहे, षडयंत्र करून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना सभापती केल्याचा असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विरोधकांना लावला. बावनकुळे यांनी शेवगाव येथे कुस्ती स्पर्धेला हजेरी लावली. यावेळी त्यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी देखील केली.
बावनकुळे म्हणाले की, राज्यासह देशात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जन्मशताब्दी सोहळा साजरा होत असताना वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेटची बैठक चौंडीला (Chondi) घेऊन 10 हजार कोटीचे कामे मंजूर करण्यात आली. देशात 5 हजारापेक्षा अधिक कार्यक्रम घेण्यात आले.
अहिल्यादेवी होळकर (Lokmata Ahilyadevi Holkar) यांनी आपल्या राज्यात जे कल्याणकारी उपक्रम राबवले, ते जसेच्या तसे महाराष्ट्रात राबविण्याचा सरकारचा संकल्प आहे. राज्यात पुढील पाच वर्षांनी प्रत्येक शेतकऱ्याला पाणी व 12 तास वीज मोफत मिळणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. तसेच आपले सरकार क्रीडा धोरण पुढे घेऊन जात आहे. गावा-गावात खेलो इंडियाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे काम सरकार करत आहे.
सर्व जिल्ह्यातील गावागावातून विविध खेळाचे चॅम्पियन तयार झाले पाहिजे, क्रीडा क्षेत्राला महत्त्व देऊन क्रीडा धोरणाचे नियोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. प्रा. राम शिंदे म्हणाले की, एप्रिल, मे महिन्यात शेवगाव, पाथर्डी भागात जनावरांचा चारा, पाणी व टँकरचा प्रश्न उद्भवतो, मात्र मे महिन्यातच चांगला पाऊस झाल्याने चारा, पाणी व टँकरचा प्रश्न सुटून आनंदाचा क्षण या भागात निर्माण झाला आहे.
राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, इंजिन आणि मशाल…
अलीकडे मैदानी खेळ कमी झाले आहे. महाराष्ट्राच्या मातीतला हा कुस्तीचा खेळ खेळला गेला पाहिजे. या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.