Chandrashekhat Bavankule : राजकीय अस्तित्त्व अन् पक्ष टिकवण्यासाठी पवारांची मोदींवर टीका

Chandrashekhat Bavankule : राजकीय अस्तित्त्व अन् पक्ष टिकवण्यासाठी पवारांची मोदींवर टीका

Chandrashekhat Bavankule on Shard Pawar : शरद पवार मोदींवर टीका करतात त्यांना आव्हान देतात तेव्हा वाईट वाटत. पण ते खाजगीमध्ये मान्य करतील की, मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाला मिळालेले नाही. राजकारणात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तसेच राहिलेला राष्ट्रवादी पक्ष टीकवण्यासाठी पवार अशी टीका करतात. असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये आज शरद पवारांचा ‘आवाज’; मुंडेंची साद,’साहेब कामाच्या माणसाला’…

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

शरद पवार हे आमच्यासाठी आदरणीय आहे. त्यांनी अनेक पंतप्रधानांसोबत काम केले आहे. पण ते मोदींवर टीका करतात त्यांना आव्हान देतात तेव्हा वाईट वाटत. पण ते खाजगीमध्ये मान्य करतील की, मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाला मिळालेले नाही. पण राजकारणात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तसेच राहिलेला राष्ट्रवादी पक्ष टीकवण्यासाठी पवार अशी टीका करतात. पण अंतर्मनातून ते कधीही टीका करू शकणार नाहीत.

Box Collection: ‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम; सहाव्या दिवशीही जमवला मोठा गल्ला

तसेच पुढे बावनकुळे म्हणाले टीका कुणावर करायची असते? ज्यांची बरोबरी आपण करू शकतो. त्यामुळे पवारांनी मोदींवर टीका करण्याऐवजी पक्षीय आत्मपरिक्षण करावं. स्वतःच्या कार्यकाळाचं आत्मपरिक्षण करावं. तसेच त्यांनी मोदींवर टीका करणं टाळावं अशी आपेक्षा करतो. असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

राज ठाकरेंवर बावनकुळे म्हणाले…
राज ठाकरे म्हणाले होते की, भाजपने फोडा फोडीचं राजकारण करण्यापेक्षा पक्ष वाढीकडे लक्ष द्याव. त्यावर बाववकुळे म्हणाले, कुणी आमच्या पक्षात यावं म्हणून आम्ही त्यांच्या घरी जात नाही. भाजप आणि मोदींवर लोकांचा विश्वास आहे. म्हणून ते येतात. तर राज ठाकरेंनी भाजपचा प्रवास समजून घेतला तर ते असं बोलणार नाहीत.

राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत. पण त्यांच्या पक्षासाठी त्यांना आमच्या पक्षावर टीका करावी लागते. त्याला आम्ही उत्तर देऊच पण त्यांनी आमच्या कार्यककर्त्यांच्या आणि नेत्यांच्या कामाची पद्धत समजून घेतली पाहिजे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube