Download App

सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ कमाईत बॉक्स ऑफिसवर हिट की फ्लॉप?

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection : बॉलिवूडचा दबंगखान सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा ईदच्या एक दिवस आधी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. पहिल्या दिवसांपासून या सिनेमाच्या कमाईचे आकडे पाहता सिनेमा आगामी दिवसात किती कमाई करणार यावर देखील प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले होते. या चित्रपटाच्या कमाईचा वेग दिवसेंदिवस चांगलाच मंदावत आहे. चित्रपटाला सातव्या दिवशी खूपच कमी गल्ला जमवता आला आहे. धक्कादायक म्हणजे आठवडाभरानंतरही सिनेमा 100 कोटींचा टप्पा ओलांडता आला नाही आहे.

गेल्या काही दिवसांपासून सलमानचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकले नाही. यातच काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला शाहरुख खान याचा पठाण या सिनेमाने तर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. शाहरुखच्या सिनेमाच्या यशानंतर आता सलमानच्या सिनेमाला देखील प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ ने गुरुवारी रिलीजच्या सातव्या दिवशी फक्त 3.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता 90.15 कोटींवर गेली आहे. या चित्रपटाने सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी फक्त पाच कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. चित्रपट रिलीज होऊन एक आठवडा झाला तरी सलमानच्या चित्रपटाला 100 कोटींचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे सलमानची बॉक्स ऑफिसवरील जादू फिकी पडल्याचे दिसून येत आहे.

जगभरात चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. मात्र, चित्रपटाच्या कमाईतील घसरण पाहता पहिल्या आठवड्यात चित्रपट देशभरात 100 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील होईल, अशी चिन्हे दिसत नाहीयेत. कमाईत सातत्याने घसरण होत आहे, वीकेंडला कदाचित आकड्यांमध्ये थोडी सुधारणा दिसू शकेल, असे अंदाज वर्तवले जात आहेत.

ठाण्यात मनपाची दुटप्पी कारवाई…सत्ताधाऱ्यांना सूट तर विरोधकांचे बॅनर उतरवले

दिग्गज कलाकारांची फौज तरीही फ्लॉप
बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्यासह दिग्गज कलाकारांची फौज या सिनेमात होती. यामध्ये पूजा हेगडे, जस्सी गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी, शहनाज गिल, विनाली भटनागर तसेच दाक्षिणात्य कलाकारांच्या भूमिका असल्या तरी हा सिनेमा प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात अपयशी ठरल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.

Tags

follow us