Download App

शाहरुखचा पठाण ठरला ‘किंग’… तर ‘भाई’ की निकली ‘जान’

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Film : काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला किंग खान शाहरुख खानचा पठाण या सिनेमाने मोठं मोठे रेकॉर्ड ब्रेक केले. आजही या सिनेमाने प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित केले. तर दुसरीकडे बॉलिवूडचा दबंगखान सलमानचा नवा सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. पठाण सिनेमापुढे सलमानच्या या सिनेमाची तिकीट विक्री देखील जेमतेमच राहिल्याचे आकडेवारीतून दिसत आहे.

सलमान नेहमी ईदच्या पार्श्वभूमीवर आपला सिनेमा रिलीज करत असतो. नुकताच त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. ईदच्या एक दिवस आधी म्हणजे 21 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र सलमानच्या या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शाहरुख खानने बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’ चित्रपटाद्वारे जोरदार कमबॅक केले.

सलमान देखील आपल्या या सिनेमाद्वारे कमबॅक करत पठाणचा विक्रम मोडेल अशी अपेक्षा सलमानच्या चाहत्यांना होती . सिनेमा रिलीज झाला मात्र पहिल्या दिवसात ‘पठाण’प्रमाणे बॉक्स ऑफिसवर भाईजानचा हा सिनेमा धमाकेदार कमाई करू शकला नाही. येत्या काळात हा सिनेमा प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करणार का? याचे उत्तर सिनेमाच्या कमाईच्या आकडेवारीतून लवकरच स्पष्ट होईल.

जाणून घ्या फर्स्ट डे कलेक्शन
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते, ‘किसी का भाई किसी की जान’ने पहिल्या दिवशी 15.81 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र, सलमान खानच्या स्टारडमनुसार कुठेतरी हे कलेक्शन थोडे कमी मानले जात आहे. तर दुसरीकडे ‘पठाण’ने पहिल्याच दिवशी 57 कोटींची कमाई करत यशाचा झेंडा रोवला होता. दुसरीकडे, रणबीर कपूरच्या ‘तू झुठी मैं मक्कर’ने पहिल्या दिवशी 15.73 कोटींची कमाई केली आहे.

चेन्नईला धक्का ! धोनी होणार निवृत्त ? ; खुद्द धोनीनेच दिली ‘ही’ माहिती

सिनेमात तगडी स्टारकास्ट
पूजा हेगडे ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसत आहे. याशिवाय चित्रपटात व्यंकटेश, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम, भूमिका चावला यांसारखे स्टार्सही आहेत. या चित्रपटात राघव सलमानच्या भावाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे.

Tags

follow us