चेन्नईला धक्का ! धोनी होणार निवृत्त ? ; खुद्द धोनीनेच दिली ‘ही’ माहिती

चेन्नईला धक्का ! धोनी होणार निवृत्त ? ; खुद्द धोनीनेच दिली ‘ही’ माहिती

MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्ज संघाचा (IPL 2023) कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चाहत्यांना निराश करणारी बातमी आहे. भारतीय क्रिकेटमध्ये अनेक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या धोनीने आता आयपीएलमधूनही निवृत्त होण्याचा इशारा दिला आहे.

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून याआधीच निवृत्ती घेतली आहे. धोनी वर्षातील दोन महिने फक्त आयपीएल स्पर्धेत सहभागी होतो. आता मात्र या स्पर्धेतही तो सहभागी होणे बंद होणार आहे. सनरायझर्स हैदराबादचा पराभव केल्यानंतर धोनी म्हणाला की हा माझा आयपीएलमधील करिअरचा अखेरचा टप्पा आहे.

सामना संपल्यानंतर हर्षा भोगले यांच्याशी त्याने संवाद साधला. धोनी म्हणाला, माझ्या करिअरचा हा अखेरचा टप्पा आहे. सध्याचे आयपीएल मागील दोन आयपीएलपेक्षा खूप वेगळे आहे. दोन वर्षांनंतर प्रेक्षक या मैदानावर सामने पाहण्यासाठी आले आहेत. येथे आल्यानंतर आम्हालाही चांगले वाटते. लोकांनी आम्हाला खूप प्रेम दिले.

Sanjay Shirsat : केवळ मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची बदनामी करणं हा राऊतांचा उद्देश

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने हैदराबादचा पराभव केला. संघातील खेळाडूंनी अप्रतिम खेळ केला. धोनीनेही या सामन्यात चांगली कामगिरी केली. विकेट किपिंग करताना त्याने अनेकदा चपळता दाखवली. सामन्यानंतर खेळाडू त्याच्या भोवती जमा झाले. त्यानंतर धोनीनेही त्याच्याकडील अनुभव या युवा खेळाडूंना सांगितले. धोनीने त्याच्या नेतृत्वात चेन्नई संघाला दोन वेळेस आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहे.

या स्पर्धेत धोनीने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या आणि संघाच्या कामगिरीच्या बळावर चेन्नईचा संघ या स्पर्धेत नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. मात्र, धोनीचा हा खेळ आता आगामी स्पर्धेत दिसण्याची शक्यता कमी आहे. कारण बऱ्याच वर्षांपासून सातत्याने क्रिकेट खेळणाऱ्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर आयपीएलमधूनही निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube