Sanjay Shirsat : केवळ मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची बदनामी करणं हा राऊतांचा उद्देश

Sanjay Shirsat : केवळ मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची बदनामी करणं हा राऊतांचा उद्देश

Sanjay Shirsat On Sanjay Raut : खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताने अनेक भाविकांचा मृत्यू झाला. दरम्यान, या मृतांचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यावर टीकास्त्र डागलं होतं. श्रीसेवकांच्या पोटात 7 ते 8 तास अन्नपाणी नव्हतं, असं या रिपोर्टमध्ये समोर आलं. त्यानंतर राऊतांनी श्रीसेवक अन्नपाण्यावाचून तडफडून मेले, असं सांगत या दुर्घटनेतील किमान आकडा हा 50 तर कमाल आकडा हा 75 इतका असल्याचं सांगितलं. दरम्यान, राऊतांच्या या वक्तव्यारून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राऊतांवर निशाणा साधला.

संजय शिरसाट यांनी बोलतांना सांगितल की, संजय राऊतांनी भयंकर स्टेटमेंट केलं आहे. खारघरला आप्पासाहेब धर्माधिकारींचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन जो गौरव करण्यात आला, त्यावेळी उष्माघाताने बळी गेले त्याबद्दल सर्वांनी दुःख व्यक्त केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह सर्वांनी दुःख व्यक्त केलं. लागणारी मदतही केली. मात्र, तरी आज संजय राऊतांनी या दुर्घटनेत 50 हून अधिक हून अधिक श्रीसदस्य चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडले, असं सांगितलं. हे वक्तव्य त्यांनी कुठल्या आधारावर केलं यामागे कुठलंही अधिकृत रेकाॅर्ड नाही, केवळ मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची बदनामी करणं हा राऊतांचा उद्देश आहे, याच आकसापोटी त्यांनी हे वक्तव्य केलं, असल्याची टीका शिरसाट यांनी केली.

नितीन करीर कर्तव्यनिष्ठ, पण सरकारच्या विरोधात चौकशी करणार का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

शिरसाट म्हणाले की, मुख्यमंत्र्यांबददल संजय राऊतांनी बोलताना मर्यादा पार केली. त्यामुळं त्यांच्याविरोधात आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली. आम्ही लेखी स्टेटमेंट दिलं आहे. भरत गोगावले, किरण पावस्कर यांच्या सहीने ही तक्रार केली आहे. कारण, लोकशाहीत बोलण्याचा अधिकार असला तरी चिड निर्माण व्हावी, उद्रेक व्हावा यासाठी कुठलेही विधानं करणं, हे योग्य नाही, असं ते म्हणाले.

किरण पावस्कर यांनीही राऊतांवर टीका केली. ते म्हणाले, धर्माधिकारी यांचा भक्तगण किती आहे, त्यांच्या भावना काय आहेत. हे माहीत असतानाही विरोधकांनी खारघर घटनेचं फक्त राजकारण केलं. वज्रमूठ सारखे ट्रकमध्ये भरून आणलेले हे लोक नव्हते. विरोधक सरकारवर खापर फोडण्यासाठी सरकारचं नाव घेतात. पैसे देऊन तोंड बंद केलं, अशी टीका विरोधक करत आहेत. असं बोलणं गलिच्छ आहे, हे शब्द वारंवार वापरणार असं राऊत म्हणाले. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वाबद्दल हे असंच बोलतात, त्याला कुठेकरी चाप बसला पाहिजे. यासाठी आम्ही जबाब नोंदवलेत, असं पावस्कर यांनी सांगिलतं.

भरत गोगावले यांनीही राऊतांवर टीका केली. राऊतांना खारघर घटनेतील मृतांचा आकडा सांगितला. उष्माघाताने मृत्यूमुखी पडलेल्यांचा त्यांनी दिलेला आकडा सिद्ध झाला तर जे बोलतील ते ऐकू, पण सिद्ध नाही झाला तर हे उलट्या पायानं चालायला तयार आहेत का?, असा टोला लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube