Box Office Collection: सुभेदार सिनेमाने पहिल्या विकेंडमध्ये किती गल्ला कमावला? घ्या जाणून…

Subhedar Box Office Collection: ‘सुभेदार’ तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम, ही अशीच एक रंजक सुवर्णगाथा सांगणारा ‘सुभेदार’ या सिनेमा २५ ऑगस्टपासून सिनेमागृहात जोरदार धुमाकूळ घालत आहे. पहिल्याच वीकेंडला सिनेमाने मोठी कामगिरी केली आहे. या जबरदस्त यशानंतर पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात ‘सुभेदार’ चित्रपटाची बॅाक्स ऑफिसवर चांगलीच घोडदौड बघायला मिळाली आहे, असा अंदाज वर्तवला जातोय. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल […]

Box Office Collection:

Box Office Collection:

Subhedar Box Office Collection: ‘सुभेदार’ तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम, ही अशीच एक रंजक सुवर्णगाथा सांगणारा ‘सुभेदार’ या सिनेमा २५ ऑगस्टपासून सिनेमागृहात जोरदार धुमाकूळ घालत आहे. पहिल्याच वीकेंडला सिनेमाने मोठी कामगिरी केली आहे. या जबरदस्त यशानंतर पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात ‘सुभेदार’ चित्रपटाची बॅाक्स ऑफिसवर चांगलीच घोडदौड बघायला मिळाली आहे, असा अंदाज वर्तवला जातोय.

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी याअगोदरच्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या सिनेमाच्या जबरदस्त यशातून त्यांची या विषयावरची आपली कमालीची पकड सिद्ध केल्याचे बघायला मिळत आहे. ‘सुभेदार’ सिनेमाच्या टिझर, ट्रेलर, गाण्यांमधून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. या सुभेदार सिनेमाने पहिल्या विकेंडमध्ये ५ कोटीपेक्षा जास्त गल्ला कमावला आहे.


दरम्यान, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, दिग्पाल लांजेकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अजिंक्य ननावरे, रिषी सक्सेना, नूपुर दैठणकर, अर्णव पेंढारकर आदि मराठीतील दिग्गज कलाकार या सिनेमा भूमिकेत आहेत.

तसेच या सिनेमातील ‘मावळं जागं झालं रं’, ‘आले मराठे’, ‘हळद लागली रायबाला’ ही तीनही गाणी सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहेत. देवदत्त बाजी, अवधूत गांधी, सुवर्णा राठोड, रोहित राऊत, निधी हेगडे यांच्या स्वरांनी या सिनेमातील गाणी सजली आहेत. संगीतकार देवदत्त बाजी यांचे संगीत गाण्यांना चांगलेच लाभले आहे.

Sukhi : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सुखी ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’सिनेमाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन्स, मुळाक्षर प्रोडक्शन्स प्रा.लि, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन्स यांनी धुरा सांभाळली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ सिनेमाचे निर्माते आहेत.

Exit mobile version