Sukhi : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सुखी ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

Sukhi : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सुखी ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आपल्या फिटनेस आणि अभिनयामुळे कायम जोरदार चर्चेत येत असते. २०२२ साली तिचा ‘निकम्मा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. (Social media) या सिनेमाला तिकीट खिडकीवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नव्हता. (Sukhi Movie) परंतु आता पुन्हा एकदा शिल्पा शेट्टी चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. बाईपणाची गोष्ट सांगणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ या मराठी स्त्रीप्रधान सिनेमाला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर डोक्यावर घेतले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)


आता पुन्हा एकदा सगळ्या नात्यातून आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या गृहिणीचा बाई होण्यापर्यंतचा प्रवास शिल्पा शेट्टीच्या ‘सुखी’ या स्त्रीप्रधान सिनेमातून बघायला मिळणार आहे. हा सिनेमा २२ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘सुखी’ या सिनेमात सुखविंदर उर्फ सुखी कालरा या ३८ वर्षीय पंजाबी गृहिणी आणि तिच्या मैत्रिणींची रंजक गोष्ट बघायला मिळणार आहे. शाळेच्या पुनर्भेट कार्यक्रमासाठी सुखी आणि तिची मैत्रिण २० वर्षांनंतर दिल्लीमध्ये पोहोचतात.

या भेटीनंतर पुन्हा एकदा १७ वर्षांची तरुणी होऊन जगण्याचे सुख अनुभवू बघणाऱ्या सुखीसारख्या प्रत्येक स्त्रीची रंजक गोष्ट या सिनेमातून उलगडणार आहे. शाळकरी मुलगी, तरुणी, प्रेयसी, बायको ते आई अशा अनेक वेगवेगळ्या भूमिका स्त्री चोख पार पाडत असते. या सगळ्यामध्ये भूमिका पार पडत असताना आपली राहिलेली स्वप्ने, इच्छा पूर्ण करणाऱ्या सुखीचा स्त्रीत्व गवसण्यापर्यंतचा प्रवास या सिनेमातून बघायला मिळणार आहे.

Abhishek Kapoor: ‘रॉक ऑन’ चित्रपटाने पूर्ण केली १५ वर्ष; अभिनेत्याने शेअर केले धमाल अनुभव!

या सिनेमातून सोनल जोशी दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. तसेच भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा आणि शिखा शर्मा यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहेत. यामध्ये शिल्पा शेट्टीबरोबर कुशा कपिला, दिलनाज इराणी, पावलीन गुजराल, चैतन्य चौधरी आणि अमित साध यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तर सिनेमाचे लेखन राधिका आनंद यांनी केले आहे. तसेच पटकथा पॉलोमी दत्ताने सांगितले आहे की. ‘सुखी’ हा सिनेमा २२ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube