“मरिया, तुम मुझसे अनार हो!” शाहरुखच्या भन्नाट संवादामागचा किस्सा; रेणुका शहाणेंनी सांगितला ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर!

Kon Honaar Crorepati Renuka Shahane: रेणुका शहाणेंनी शाहरुख खानसोबतच्या ‘सर्कस’ मालिकेतील भन्नाट किस्सा सांगितला. माधुरीलाही हसू आवरलं नाही.

Kon Honaar Crorepati Renuka Shahane Shah Rukh Khan Funny Incident

Kon Honaar Crorepati Renuka Shahane Shah Rukh Khan Funny Incident

Kon Honaar Crorepati Renuka Shahane Shah Rukh Khan Funny Incident: माधुरी दीक्षितच्या दिलखुलास गप्पा आणि तिच्या मिश्किल अंदाजामुळे सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नुकत्याच एका भागात रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे यांनी माधुरीसोबत गप्पा मारताना ‘हम आपके है कौन’च्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांमध्ये रेणुका यांनी शाहरुख खानसोबतच्या ‘सर्कस’ मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान घडलेला एक भन्नाट किस्साही सांगितला. हा किस्सा ऐकून माधुरीला हसू आवरता आलं नाही.

 

रेणुका शहाणे म्हणाल्या, “सर्कसच्या काही दृश्यांचं चित्रीकरण झाल्यानंतर दिग्दर्शक अझीझ मिर्झा यांनी मला सांगितलं की, ‘तुझा हिंदी संवादातील मराठी लहेजा कमी करण्यासाठी तू हिंदीत जास्त बोलायला हवंस.’ त्यांनी शाहरुखलाही त्याचा हिंदी संवादातील पंजाबी लहेजा कमी करण्यासाठी हाच सल्ला दिला. त्यामुळे शाहरुख थोडा टेन्शनमध्ये होता. एका दृश्यात मी समोर आल्यावर तो संवाद म्हणताना म्हणाला, ‘मरिया, मुझे मालूम है तुम मुझसे अनार हो!’ खरं तर त्याला ‘नाराज हो’ असं म्हणायचं होतं.”

ठाकरे-शिंदेंच्या दसरा मेळाव्यात आज राजकीय संघर्ष; कोण कुणाला देणार प्रत्युत्तर?

शाहरुखच्या या अनपेक्षित फम्बलमुळे त्या प्रसंगात विनोदाची भर पडली. रेणुका यांचा हा किस्सा ऐकताना माधुरीसह उपस्थितांनाही हसू आवरता आलं नाही. कलाकारांच्या जुन्या आठवणी, पडद्यामागचे किस्से आणि मनमोकळ्या गप्पांमुळे ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर रंगत वाढली.

A Perfect Murder मधून पहिल्यांदाच साकारणार रुपाली भोसले सस्पेन्स-थ्रिलर भूमिका

माधुरी दीक्षितसोबतच्या अशाच मनोरंजक गप्पा, जुन्या आठवणी आणि हास्याचे क्षण अनुभवण्यासाठी पाहायला विसरू नका ‘कोण होणार करोडपती’, सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता, सोनी मराठी आणि सोनी लिववर.

Exit mobile version