Kshitish Date On Dharmveer 2 Movie: उत्कृष्ट अभिनेता असलेला क्षितिश दाते ‘धर्मवीर 2’ (Dharmveer 2 Movie) सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Marathi Movie) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा साकारून क्षितिश दातेने (Kshitish Date) प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. सध्या प्रसाद ‘धर्मवीर 2’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. (Marathi Movie) या सिनेमाच्या निमित्ताने तो अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. अशाच ‘लेट्सअप’ला दिलेल्या मुलाखतीत क्षितिशने अभिनयातील करिअर, ‘धर्मवीर 2’ याबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला.
अभिनेता क्षितिश दातेने नुकतचं लेट्स अप मराठी चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या चित्रपटसृष्टी तसेच वैयक्तिक आयुष्यातील अनेक विषयांबद्दल खुलासा केला आहे. म्हणाला की, ‘ खूपच अवघड आहे, इतर अनेक कलाकृतीप्रक्षा खूपच वेगळी आहे. ह्यात आणि कार्यरत असलेल्या मी व्यक्तीच पात्र साकारतोय, आणि २ वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे कसे होते, आणि आता कसे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इतके प्रकाश झोतात आणि मीडियासमोर असणारा माणूस आपण स्क्रीनवर फिक्सल असल्यासारखं सादर करणं. हे खूप कठीण गोष्ट आहे. आणि प्रवीण तरडे आहेत म्हणून ते शक्य आहे. त्याच कारण असं की, ते खूप वेगळं रसायन आहे. त्यांच्यावर सरस्वती प्रसन्न आहे. ते काहीपण करू दे, ते भारीच करतात. आणि त्यांच्या सपोर्टमुळे, आपल्याला हातातलं काम असं वाटू लागत आणि बघितलं की, नाही रे, खूप दिवस हे आपण करत होतो. आपण खूप कष्ट घेतले आहेत यावर… आणि ते फिजिकलपणे देखील खूप टॅाक्सींग आहे. दाढी, मिशी, कपडे.. आणि ते पांढरे कपडे बघायला छान वाटता,. ते टाइट आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही पोशाख घालता, त्यावेळेस कळत की, ते कॅम्फटेबल नाहीय. असं सगळंच आहे. पण मला ऍक्टर म्हणून खूप भारी वाटत. कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अचानक अभ्यास होऊ लागत. जस मुळशी पॅटर्नच्या वेळेला शेती, गुन्हेगारी, गँगवार अशा नव्या गोष्टी अनुभवायला मिळाले.
पुढे म्हणाला की, मी अधिकाराने 4 गोष्टी सांगू शकतो की, एवढं नक्की माहितीय. मित्र आहे. तस राजकारणाबाबत नाही, धर्मवीरबाबत तस नाही, या सिनेमातून माझी मिळकत फक्त कौतुक, प्रसिद्धी किंवा मोठ्या सिनेमाचा भाग नाही. त्यापलीकडे माझ्यासाठी मोठं विश्व निर्माण झालं आहे. ज्या काही वयाचं आहे, या सर्वांपेक्षा मी लहान आहे. पण त्या यांच्यात मला त्यांच्या जे इनर गोष्टी सगळ्या, पॉलिटिक्सची प्रोसेस काय आहे. नागरिक म्हणून माझ्याकडे ज्या काही गोष्टी येतात.. त्याच स्रोत काय आहे, निर्णय काय होत असतात. या सर्व गोष्टी कळल्या आणि त्या गोष्टी स्वीकारणं माझ्यासाठी खूप जड आहेत. कारण मी तितका तयार नसताना ते माझ्यापर्यंत आलेला आहे.
एकनाथ शिंदेबद्दल पुढे म्हणाला की, एक कार्यक्रम मी होस्ट करत होतो. आणि जस्ट धर्मवीर रिलीज झाला होता. आणि मी स्टेजवर होतो. नगरविकास मंत्री म्हणून ते पहिल्या रांगेत येऊन बसले होते. आणि मला असं वाटायलं की, आरे यार यांनी माझं सिनेमा पाहिलंय, मी पळतो आता इथून मला त्यांना फेस नाही करायचं. असं मला झालं. कारण सिनेमा झाल्यानंतर तितकी आमची भेट झाली नव्हती. आणि ते हस्तक्षेप करत नाहीत. ते सेटवर कधी अभिनय बघायला येऊन बसत नव्हते. आणि ते तितकेच लोकनेता आहेत. पण असं अपोर्चबेल नाहीत की, शिंदे साहेब मला तुमच्याशी थोडं गप्पा मारायचं आहे. असं नाहीय ते, ते खूप बीजी असतात. भयंकर बीजी असतात ते. हाती लागत नाहीत. ते एका दिवसात तीन-तीन जिल्हे काम करून रात्री २ वाजता येत असतात. तस काही ऐवज त्यांच्याशी गप्पा काय नाही झाल्या. आणि मी त्यांच्याकडे बघितलं आणि स्मितहास्य केलं आणि त्यांनी देखील तेवढंच केलं. आणि ते माझ्यासाठी खूप भारी होत. आणि त्यांनी अनेकवेळा म्हणालेत की, माझं काम त्यांना खूप आवडलं आहे.
Dharmaveer 2 : ‘धर्मवीर 3’मध्ये काय असेल? प्रसाद ओक स्पष्टच बोलला, म्हणाला- ‘लोकांना वाटतं…’
आणखी एक गोष्ट अशी की, सिनेमाच्या प्रीमियर नंतर ते मुद्दाम माझ्यापर्यंत आले, आणि म्हणाले की, आरे…. तू इतका सेम वाटतोय, इतका सेम वाटतोय ये प्रभाकर इकडं ये, आपल्याला ज्या- ज्या ठिकाणी जायला जमत नाही. याला कपडे घालून पाठवत जा.. याला ते लूक, आवाज वगरे सगळं जमलं आहे. उद्या आहे का..?उद्या गडचिरोलीला जातो का…? बट्टे काकांना घेऊन चला. आणि मला याच क्रेडिट मला घेऊ वाटत नाही. उलट मला असं लोक म्हणतात. की, तू शिंदे साहेबांसारखा दिसतो. आणि मग मी ओके म्हणतो. दिसणं हे यात माझं काहीच नाहीय… विद्याधर भट्टे आणि मानसी अत्तरडे यांनी पार्ट 2 चे पोशाख बनवले आहे. त्या दोघांचं क्रेडिट आहे. त्याच्यात प्राण ओतणं आणि वाटणं हे माझं क्रेडिट आणि प्रवीणचं डीओपीन, निर्माते म्हणून खूप कष्ट घेतले आहेत.
‘धर्मवीर-2′ चित्रपटाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाच्या रिलीजबाबत मोठी अपडेट समोर आली आहे .’धर्मवीर-2’ चित्रपटाचा नवा ट्रेलर समोर आला असून चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘धर्मवीर-2’ चित्रपट येत्या 27 सप्टेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या अगोदर चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती, मात्र आता चित्रपटाला मुहूर्त सापडला आहे.