Download App

कुणाल खेमूच्या ‘मडगाव एक्सप्रेस’ने तिसऱ्या दिवशी वेग पकडला, पहिल्या वीकेंडमध्ये उत्तम कमाई

Madgaon Express Box Office Collection Day 3: “मडगाव एक्सप्रेस (Madgaon Express) प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. अभिनेता कुणाल खेमूच्या (Kunal Khemu) दिग्दर्शनाखाली बनलेला हा त्याचा पहिला चित्रपट आहे. ”मडगाव एक्स्प्रेस हा एक विनोदी-सिनेमा आहे, (Box Office Collection) जो 22 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. चित्रपट रिलीज होऊन फक्त तीन दिवस झाले आहेत आणि चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 7 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.

SACNILC च्या अहवालानुसार, “मडगाव एक्सप्रेस 1.5 कोटी रुपयांनी सुरू झाली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ होऊन चित्रपटाने 2.75 कोटी रुपयांची कमाई केली.आता तिसऱ्या दिवशी रविवारचा आणि विकेंडचा फायदा घेत ‘मडगाव एक्सप्रेस’ला मिळाला असून चित्रपटाने 2.85 कोटींची कमाई केली आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 7.10 कोटींचा व्यवसाय केला आहे.

कुणाल खेमूचा चित्रपट ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ला मागे टाकला

रणदीप हुड्डा यांच्या चरित्रात्मक चित्रपट ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सोबत मडगाव एक्सप्रेस 22 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. संघर्षानंतरही कुणाल खेमूचा चित्रपट जोरदार कमाई करत असून कलेक्शनच्या बाबतीत ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ला मागे टाकत आहे. ‘मडगाव एक्स्प्रेस’ने तीन दिवसांत 7.10 कोटींची कमाई केली आहे, तर रणदीप हुडा स्टारर ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाचे कलेक्शन केवळ 5.90 कोटी आहे.

वीकेंडला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचा जलवा; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन…

मडगाव एक्सप्रेसचे जगभरातील कलेक्शन

“मडगाव एक्सप्रेस फक्त 20 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे. छोट्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने दोन दिवसांत जगभरात 5 कोटींची कमाई केली आहे. मडगाव एक्स्प्रेसच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर दिव्येंदू, अविनाश तिवारी, प्रतीक गांधी आणि नोरा फतेही या कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

follow us