हातात कॉफीचा मग अन् धो धो कोसळणारा पाऊस : पहिला पावसानंतर कुशलचा रोमॅन्टिक अंदाज

Kushal Badrike Post : ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला आहे. आता पहिला पाऊस पडल्याने तो रोमँटिक अंदाजात एक खास पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. […]

Kushal Badrike Post

Kushal Badrike Post

Kushal Badrike Post : ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला आहे. आता पहिला पाऊस पडल्याने तो रोमँटिक अंदाजात एक खास पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


कुशल बद्रिके सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सोशल मीडियावर देखील तो चांगलाच अॅक्टिव्ह आहे. आता या वर्षातला पहिला पाऊस पडला असून विनोदवीराने रोमँटिक अंदाजात खास पोस्ट लिहिली आहे.

कुशलने लिहिलं आहे की, “आता पहिल्या पावसात भिजायला जात नाही मी, कोसळू देतो त्याला तुझ्या आठवांसारखा. मात्र मनमोकळा श्वास घेतो भिजल्या मातीचा… तुझ्या केसांसारखा….(सुकुन)”. कुशलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. तसेच या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

कुशल बद्रिकेच्या पोस्टवर चाहत्यांनी अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. पाऊस आला का गावाकडे पाठवा प्रयेसी नहीं पण जमीन तहानली आहे, मी पण हे वाक्य चोरणार आणि माझा फोटो टाकून स्टेटस ठेवणार, दादाssss तुमचे शब्द अगदी काळीज चिरत जात आहेत .. खरंच, सुकुन, कुशल तू हळूहळू कवी होत आहेस, तुझ्याकडे पण आला वाटतं, हृदयस्पर्शी, अशा कमेंट्स चाहते करत आहेत. तर अंशुमन विचारेने लिहिले आहे,”चल झुटे”.

Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन

कुशल बद्रिकेने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वत:ची अनोखी ओळख निर्माण केली आहे. छोटा पडदा गाजवण्याबरोबरच त्याने सिनेमे आणि वेबसीरिजमध्ये देखील काम करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. कुशल बद्रिके सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे. छोट्या पडद्यावर विनोद निर्मिती करणारा कुशल सोशल मीडियावर मात्र गंभीर पोस्ट करत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्यक्त होतो. त्यामुळे त्याच्या पोस्टची चाहते आतुरतेने वाट बघत असतात.

Exit mobile version