Download App

‘क्योकिं सास भी कभी…’ मालिकेतील अभिनेता विकास सेठीचं निधन, वयाच्या 48 वर्षी घेतला अखेरचा श्वास

'क्योंकी सास भी कभी बहू थी' (Kyoki Saas Bhi Kabhi Bahu Thi) या मालिकेतील प्रसिध्द अभिनेता विकास सेठीचे (Vikas Sethi) निधन झालं.

  • Written By: Last Updated:

Vikas Sethi passed away : हिंदी टेलिव्हिजन जगतातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. छोट्या पडद्यावरील ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ (Kyoki Saas Bhi Kabhi Bahu Thi) या मालिकेतील प्रसिध्द अभिनेता विकास सेठीचे (Vikas Sethi) निधन झालं. वयाच्या 48 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटक्याने विकासचं निधन झाल्याचं समोर आलं. अभिनेत्याच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विकासच्या निधनामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि सेलिब्रिटी श्रध्दांजली वाहत आहेत.

फडणवीसांनी मारुन टाकलं तरीही ते आमदार विरोधात बोलणार नाहीत; जरांगे पाटील असं का म्हणाले? 

विकासच्या निधनामुळे टीव्ही विश्वात शोककळा पसरली आहे. 2002 पासून विकास घरांघरात प्रसिद्ध होता. त्याने क्योंकी सास भी कभी बहू थी, कहीं तो होगा, कसौटी जिंदगी की यासारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकेनंतर विकासने कधीही मागे वळून पाहिलं नाही. दरम्यान, रविवारी (8 सप्टेंबर) त्याचा मृत्यू झाला. टेली चक्कने दिलेल्या वृत्तानुसार, विकासचा झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

फडणवीस नावाचं रसायन काय आहे? हे तुझ्या मालकाला चांगलंच कळलं असेल; नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार 

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्याच्या निधनाची चर्चा रंगली आहे. पण सेठीच्या कुटुंबाकडून अद्याप निवेदन जारी करण्यात आलेले नाही. विकासच्या पश्चात पत्नी आणि लहान जुळी मुले असा परिवार आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे कुटुंबिय, चाहते आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, विकास सोशल मीडियावर खूप सक्रिय होता. तो अनेकदा त्याची पत्नी जान्हवी सेठी आणि जुळ्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असे. त्याने 12 मे रोजी शेवटची पोस्ट केली होती, ज्यामध्ये तो त्याच्या आईसोबत दिसत आहे.

विकासच्या टीव्ही विश्वातील कामाबद्दल सांगायचे तर, त्याने पूर्वाश्रमीची पत्नी अमितासोबत ‘नच बलिये 3’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता. कभी खुशी कभी गम या चित्रपटाचाही तो भाग होता. त्याने करिनाच्या मित्र रॉबीची भूमिका साकारली होती. अर्जुन रामपाल आणि दिया मिर्झा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या असलेल्या ‘दीवानापन’मध्येही विकास सेठी दिसला होता.

follow us