Download App

मोठी बातमी! ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अभिनेत्याचा मृत्यू

  • Written By: Last Updated:

Actor Santosh Nalawade Death In Accident : कलाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. ‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Aamchi Collector) ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील अभिनेता संतोष हणमंत नलावडे (Santosh Nalawade) यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलंय. एका रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

अभिनेता संतोष हणमंत नलावडे (Marathi Actor) हे 49 वर्षाचे होते. त्यांचं रस्ते अपघातात निधन (Entertainment News) झालंय. नलावडे यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. चाहते सुद्धा हळहळ व्यक्त करत आहेत.

‘आरडी’ चित्रपटाचा दमदार टीजर लॉन्च! ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

संतोष नलावडे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रेकॉर्ड विभागामध्ये कार्यरत होते. ते नांदेड येथे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी गेले होते. त्यावेळी नलावडे यांचा अपघात झाला अन् ते गंभीर जखमी झाले. नलावडे यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.

इतिहास संशोधक सावंतांना ‘छावा’विरोधात बोलणं महागात पडलं, मुख्यमंत्र्यांचं नाव घेत धमकीचा फोन

नलावडे यांच्या सातारा तालुक्यातील वाढे या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. संतोष यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार देखील मोठा होतो. हौशी नाटकांमधून संतोष नलावडे यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी ‘अप्पी आमची कलेक्टर, शेतकरी नवरा हवा, लाखात एक आमचा दादा, मन झालं बाजींद, कॉन्स्टेबल मंजू, लागीर झालं जी ‘ या मालिकांमध्ये सुद्धा काम केलं होतं. सोबतच त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये सहकलाकार म्हणून काम केलंय.

 

follow us