अभिनयाची सुरूवात ‘मन्नत’ पासून; ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेमनं उलगडली लाईफ जर्नी
Appi Aamchi Collector Rohit Parashuram: आयुष्य जगायला शिकवणारं शहर, अभिनय क्षेत्राचं माहेर घर अशी ओळख मुंबई शहराची आहे. उराशी बाळगलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लाखो लोक या शहरात येतात. काहींना यश मिळतं तर काही निराश होऊन पुन्हा जोमाने कामाला लागतात. असाच एक कलाकार ज्याने मुंबईतील अभिनयाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात किंग खान म्हणजेच शाहरूख खानच्या ‘मन्नत’ घरापासून केली. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला रोहितचा प्रवास बॉडिबिल्डर म्हणून सुरू झाल्याचे तो सांगतो.
रोहितशी गप्पा मारताना कळले की, शाळेत असताना रोहित वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन पहिला क्रमांक पटकवायचा आणि तेथून हा कलाकार घडत गेला. वक्तृत्वामध्ये अव्वल असल्यामुळे महाविद्यालयात मला सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाल्याचे रोहित म्हणाला. 2017 मध्ये मिस्टर इंडियाच्या स्पर्धेमध्ये खेळला. त्यापूर्वी त्याने 2006 पासून बॉडी बिल्डिंगचे प्रशिक्षण सुरु केले यात त्याने राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिकं पटकावले. त्यानंतर त्याने पुण्यात स्वतःची व्यायामशाळा सुरु केली. या ठिकाणी जवळ पास 650 प्रशिक्षणार्थी त्याचा हाताखाली प्रशिक्षण घेत होते.
अन् आयुष्याला मिळाले नवीन वळण
2018 ला माझ्यात लपलेल्या कलाकाराची भेट झाली आणि आयुष्याला एक नवे वळण मिळाले अन् येथूनच अभिनयक्षेत्रातला प्रवासाला सुरूवात झाली. माझ्यातल्या कलाकाराची ओळख झाल्यानंतर मी ज्येष्ठ अभिनेत विक्रम गोखलेंकडून कलेचे धडे घेतले आणि त्यानंतर स्वप्नांचे शहर असलेल्या मुंबईत दाखल झालो.
शाहरूखच्या ‘मन्नत’ पासून केली अभिनयाला सुरूवात
अभिनयाची गोडी असणाऱ्या आणि नसणाऱ्या प्रत्येकाला पिक्चरमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध कलाकारांची क्रेझ असते. तशीच क्रेझ रोहितलापण होती. त्यामुळेच मी मुंबईत दाखल झाल्यानंतर बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळख असलेल्या शाहरूखचा ‘मन्नत’ बंगला गाठला आणि अभिनय क्षेत्रातल्या प्रवासाचा श्रीगणेशा केला. भविष्यात आपण एक दिवस नक्की शाखरूखसोबत असेल असा विश्वास रोहितनं त्याचा अभिनयाचा प्रवास उलगडताना व्यक्त केला आहे.
दीपिका पदुकोणच्या ‘फायटर’चा फर्स्ट लूक आला समोर, प्रजासत्ताकदिनी होणार प्रदर्शित
कोल्हापूरच्या तालमीत शिकलो पाककला
लग्नानंतरच्या आयुष्याची शिल्पकार माझी बायको पूजा असल्याचे रोहित आवर्जून सांगतो. मी पाककला कोल्हापूरच्या तालमीत होतो तेव्हा शिकलो. पण, पुरणपोळी मला पूजाने शिकवली. वडिलांचे हॉटेल असल्यामुळे सणावाराला मी तेथे रांगोळी काढत असे अशी आठवणही रोहितने सांगितली.