दीपिका पदुकोणच्या ‘फायटर’चा फर्स्ट लूक आला समोर, प्रजासत्ताकदिनी होणार प्रदर्शित

  • Written By: Published:
दीपिका पदुकोणच्या ‘फायटर’चा फर्स्ट लूक आला समोर, प्रजासत्ताकदिनी होणार प्रदर्शित

Deepika Padukone First Look: दीपिका पदुकोण (Deepika Padukone ) तिच्या आगामी ‘फाइटर’ (Fighter Movie) चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटात ही अभिनेत्री हृतिक रोशनसोबत (Hrithik Roshan) दिसणार आहे. दीपिकाचे चाहतेही या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक असून चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, चाहत्यांची उत्कंठा वाढवत निर्मात्यांनी चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लुक (Deepika Padukone First Look) रिलीज केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)


दीपिका पदुकोणने इन्स्टाग्रामवर तिचा फर्स्ट लूक पोस्टर पोस्ट केला आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्री चष्मा घातलेल्या पायलट गणवेशात दिसत आहे. या पोस्टरमध्ये तिच्या पात्राचे नाव देखील समोर आले आहे. पोस्टरमध्ये ‘मिन्नी’ असे लिहिले आहे. यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील सांगितली आहे.

दीपिकाने तिच्या पोस्टला कॅप्शनमध्ये दिले आहे की, “स्क्वाड्रन लीडर मिनी राठौर, कॉल साइन- मिनी, पदनाम- स्क्वाड्रन पायलट, युनिट- एअर ड्रॅगन”, असे कॅप्शन अभिनेत्रीने यावेळी दिले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील हृतिक रोशनचा लूकही समोर आला होता, जो चाहत्यांना खूप आवडला होता. त्याचबरोबर दीपिका पदुकोणचा लूक पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढत असल्याचे बघायला मिळत आहे.

Fighter First Look: हृतिक रोशनच्या ‘फायटर’चा फर्स्ट लूक आऊट!

हृतिकच्या पोस्टवर चाहते आणि यूजर्सच्या कमेंट्सचा मोठ्या प्रमाणात वर्षाव होत आहे. सुरुवातीला, सुपरस्टारच्या चाहत्यांनी त्याच्या फर्स्ट लूकला पसंती दर्शवली. मात्र त्यानंतर असे काही यूजर्स आले, ज्यांनी त्याची तुलना ‘टॉप गन’शी केली. एका यूजरने लिहिले, ‘टॉप गनची कॉपी. बॉलिवूडची तीच जुनी सवय. दुसर्‍या यूजरने लिहिले आहे की, ‘फर्स्ट लूक ठीक आहे, संपूर्ण सिनेमाला टॉप गनची कॉपी बनवू नका.’

‘फायटर’ हा इतर चित्रपटापेक्षा अनोखा आहे. ही कथा वेगळ्या पद्धतीने बनवली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे आणि Viacom18 स्टुडिओने Marflix Pictures च्या सहकार्याने या सिनेमाची निर्मिती केली आहे. देशभक्तीच्या भावनेने, हा ‘फायटर’ सिनेमा भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या 25 जानेवारी 2024 च्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube