‘Fighter’ सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित; दीपिका, हृतिक अन् अनिक कपूर यांच्या लूकनं वेधलं लक्ष

‘Fighter’ सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित; दीपिका, हृतिक अन् अनिक कपूर यांच्या लूकनं वेधलं लक्ष

Fighter motion poster: आज स्वातंत्र्यदिनानिमित्त अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) व अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या फायटर (Fighter) या सिनेमाचे मोशन मोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या मोशन पोस्टमध्ये अनिल कपूर, हृतिक आणि दीपिका यांचा हटके लूक बघायला मिळत आहे. फायटर हा सिनेमा पुढच्या वर्षी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)


दीपिकानं ‘फायटर’ या नव्या सिनेमाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत सांगितले आहे की,”आपल्या गौरवशाली राष्ट्राला सलाम. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार फायटर. २५ जानेवारी २०२४. फायटर सिनेमा मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते या सिनेमाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

दीपिकानं शेअर केलेल्या या पोस्टला अनेक चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत असल्याचे बघायला मिळत आहे. एका चाहत्यांनी कमेंट केली, ‘आम्ही खूप एक्सायडेट आहोत.’ तर दुसऱ्या चाहत्यांनी कमेंट करत म्हणाले आहे की,’आम्ही या सिनेमाची वाट बघत आहोत’ हृतिकनं रोशन देखील सोशल मीडियावर फायटर सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरला त्यानं कॅप्शन दिले आहे की, “वंदे मातरम्! भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला चित्रपटगृहांमध्ये भेटूयात. फायटर २५ जानेवारी २०२४ रोजी देशातभरात प्रदर्शित होत आहे.

‘Subhedar’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलली, कारण सांगत चिन्मय मांडलेकर म्हणाला…

फायटर या सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केल आहे. हृतिकने याअगोदर सिद्धार्थसोबत वॉर या सिनेमामध्ये काम केले आहे. तर दीपिकानं सिद्धार्थच्या ‘पठान’या सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारल्याचे बघायला मिळाले आहे, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. सिद्धार्थ आनंदनं दिग्दर्शित केलेल्या सिनेमाना चाहत्यांची मोठी पसंती मिळत असते. त्याचा पठाण हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आहे. पठाण सिनेमात दीपिताबरोबर किंग खान, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील मुख्य भूमिका साकारली आहे. आता सिद्धार्थच्या फायटर या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube