Aatmapaphlet : ‘या’ कारणासाठी ललित प्रभाकर पोहोचला आत्मपॅम्प्लेटच्या सेटवर

Aatmapaphlet : मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम हंक ललित प्रभाकरच्या (Lalit Prabhakar) यंग क्राऊड भलतंच प्रेमात आहे. त्यात त्याच्या फिमेल फॅन्स जरा जास्तच आहेत. मालिकांपासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या ललितने हळूहळू मालिकांनंतर सिनेमा आणि वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता ललित चक्क परेश मोकाशी (Paresh Mokashi) लिखित आणि आशिष बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्प्लेट’च्या (Aatmapaphlet) सेटवर पडद्यामागील कलाकारांसोबत त्यांना […]

Lalit Prabhakar

Lalit PrabhakarDesign (2)

Aatmapaphlet : मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम हंक ललित प्रभाकरच्या (Lalit Prabhakar) यंग क्राऊड भलतंच प्रेमात आहे. त्यात त्याच्या फिमेल फॅन्स जरा जास्तच आहेत. मालिकांपासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या ललितने हळूहळू मालिकांनंतर सिनेमा आणि वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता ललित चक्क परेश मोकाशी (Paresh Mokashi) लिखित आणि आशिष बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्प्लेट’च्या (Aatmapaphlet) सेटवर पडद्यामागील कलाकारांसोबत त्यांना मदत करतांना दिसला. आता त्याने हे असं का केलं, याचे कारण खुद्द ललितने सांगितलं.

Asain Games 2023 : बीडच्या अविनाश साबळेचा डबल धमाका; 5 हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक 

आपल्या देखणेपणानं आणि दर्जेदार अभिनयानं तरुणांच्या, विशेषत: तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ललितने आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. चि आणि चि. सौ. का सारख्या चित्रपटातील मस्तीखोर, अतरंगी मुलगा तर आनंदी गोपालमधील शिस्तप्रिय, बायकोच्यामागे खंबीरपणे उभा असलेला नवरा. ललितच्या अभिनयाच्या छटा आपण अनेकदा पाहिल्या. आता ललितची आणखी एक नवी बाजू प्रेक्षकांसमोर आली आहे. ललितने नुकतीच ‘आत्मपॅम्प्लेट’च्या सेटवर हजेरी लावली आहे. आणि पडद्यामागील कलांकारांना चक्क मदत केली.

याविषयी बोलतांना ललित प्रभाकर म्हणतो, आशिष माझा खूप जवळचा मित्र आहे आणि मला त्याच्या पहिल्या चित्रपटाचा भाग व्हायचे होतं. आशिष एक व्यक्ती म्हणून तर उत्तम आहेच, याशिवाय, एक दिग्दर्शक म्हणूनही तो सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळं त्याच्या या प्रोजेक्टमध्ये माझा काहीतरी भाग असावा, असं मला मनापासून वाटतं होतं. त्यामुळे मी सेटवर जाऊन त्याला थोडी मदत करण्याचा प्रयत्न केला. हा अनुभव माझ्यासाठीही खूप मस्त होता.

ललितेने सांगितलं की, त्यात झी स्टुडिओज, परेश मोकाशी यांच्यासोबतही माझे एक वेगळे नाते आहे. त्यामुळे या प्रोजक्टच्या निर्मितीसाठी मी थोडाफार का होईना, माझा हातभार लावला आणि त्याचा मला खूप आनंद झाला आहे. या चित्रपटातील सर्व बालकलाकार एकदम जबरदस्त आहेत. काय कमाल अभिनय करतात ही मुलं. त्यांच्यासोबतही थोडी मजामस्ती केली.

भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओच्या मयसभा मंडळ निर्मित ‘आत्मपॅम्लेट’मध्ये ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘आत्मपॅम्प्लेट’ येत्या 6 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे

Exit mobile version