Asain Games 2023 : बीडच्या अविनाश साबळेचा डबल धमाका; 5 हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक

Asain Games 2023 : बीडच्या अविनाश साबळेचा डबल धमाका; 5 हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक

Asain Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळेने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत 5 हजार मीटर शर्यतीत अविनाश साबळेने रौप्यपदक पटकावलं आहे. रौप्यपदाकाआधी अविनाश साबळेने सुवर्णकामगिरी केली. 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यानंतर आता पुन्हा रौप्यपदक पटकावून साबळेने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे. अविनाश साबळे याने आज चीनमध्ये महाराष्ट्राचे नाव गाजवले, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अविनाशने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. तसेच, अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. त्याने 8:19:53 मिनिटे पूर्ण केले. या स्पर्धेतील भारताचे हे 12वे सुवर्णपदक आहे.

गिधड धमक्या, ठाकरेंना इशारा! नार्वेकरांनी सांगितलं अपात्र आमदारांच्या निकालाचं प्लॅनिंग

कोण आहे अविनाश साबळे?
काही वर्षापूर्वीपर्यंत लांब पल्ल्याच्चया धावपटूंच्या नावावार भारताचा कोटा रिक्त होता. पण, बीडमधील मांडवा गावात 13 सप्टेंबर 1994 रोजी जन्मलेल्या अविनाशे ती जागा भरून काढली. अविनाशने पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले.

निवडणुकांचं बिगुल वाजलं! राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान…

घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याचे आई-वडील वीटभट्टीवर काम करायचे आणि त्यातही त्यांना तो मदत करत असे. घरापासून शाळा ६ किलोमीटर दूर असल्यानं त्यांना पायीच शाळेत जावं लागे. अशावेळी तो शाळेत जाताना धावण्याचा सराव करायचा.

Weather Update : पुढील 24 तास महत्वाचे; ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट

त्याच्या याच धावण्याच्या सवयीमुळं तो 2005 मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. अविनाशने १२ वी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अविनाश भारतीय लष्कराच्या ५ महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला होता. खेळात करिअर करायचा कधी विचार केला नव्हता, मात्र, आज त्याने इतिहास रचला.

अविनाश गेल्या महिन्यात बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 7 व्या स्थानावर होता. त्यामुळे खुद्द अविनाश साबळेसुद्धा त्याच्या कामगिरीवर खूश नव्हता. मात्र, आता त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत नव्या उमेदीने सहभाग घेत सुवर्णपदक आणि आता रौप्यपद पटकावल्याने सर्वच स्तरातून त्याचं कौतूक करण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube