Download App

‘ललिता शिवाजी बाबर…’ लवकरच चित्रपटगृहात

  • Written By: Last Updated:

Lalita Babar : भारताची सुवर्णकन्या, मोहीची वायुकन्या म्हणून ओळख असलेली प्रसिध्द धावपटू ललिता बाबरचा जीवनपट आता रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ललिता बाबरच्या भूमिकेत दिसणार आहे . अमृताने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करत याबाबत माहिती दिलीय.

अंत्यत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ललिताने जागतिक स्तरावर विक्रमी कामगिरी केलीय. भारताची राष्ट्रीय विक्रमवीर ते आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटूपर्यंतचा ललिता बाबरचा प्रवास या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

चंद्रमुखी चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर मराठमोळी अभिनेत्री  अमृता खानविलकर आता धावपटू ललिता बाबरच्या भूमिकेत दिसणार आहे. या निमित्ताने अमृताला एका नव्या भूमिकेत पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.

अमृता आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणते…चंद्रमुखीची कात टाकून आता ही नवी कात ओढण्याची वेळ आलीय. नव्या वर्षाचं नवं स्वप्नं …. नवं धाडस … नवी परीक्षा म्हणत तिने ही गुड न्यूज तमाम महाराष्ट्राला दिलीय.

ललिताच्या भूमिका साकारायला मिळणे ही एक सुखावह बाब असल्याचं अमृता नमूद करते. ज्या व्यक्तीने देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले अशा व्यक्तीची भूमिका साकारणे शिवधनुष्य पेलण्यासारखे असल्याचे ती स्पष्ट करते. तसेच आपलं प्रेम, आशीर्वाद पाठिशी असू द्या अशी साद अमृता खानविलकर आपल्या चाहत्यांना घातली आहे.

 

Tags

follow us