Lew Palter Passed Away : जेम्स कॅमरुनच्या ‘टायटॅनिक’ (Titanic) या बहुचर्चित चित्रपटांतील अभिनेते ल्यू पाल्टर (Lew Palter) यांनी ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ते काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. मिळालेल्या माहितीनुसार, पाल्टर यांचे २१ मे रोजी कर्करोगामुळे (Lew Palter Dies) निधन झाले आहे.
Lew Palter, ‘Titanic’ Actor and Longtime CalArts Teacher, Dies at 94.
He worked alongside Judd Hirsch on 'Delvecchio,' played a Supreme Court justice in 'First Monday in October' and mentored Ed Harris, Don Cheadle, Cecily Strong and many others. https://t.co/GYX17vbcJ6— Tommy Lightfoot Garrett (@LightfootInHwd) June 27, 2023
अभिनेते ल्यू पाल्टर हे ‘फर्स्ट मंडे इन अक्टूबर’ या चित्रपटात वकिलाच्या भूमिकेमध्ये दिसून आले होते. १९८१ मध्ये हा चित्रपट चाहत्याच्या भेटीला आला होता. या चित्रपटामध्ये ते वाल्टर मथाऊ, जिल क्लेबर्ग आणि बरनार्ड ह्यूजेसबरोबर काम केले होते. तसेच ‘द फ्लाइंग नन’, ‘हिल स्ट्रीट ब्लूज’ आणि ‘एलए लॉ’ या चित्रपटात देखील त्यांनी आपल्या अभिनयाची चांगलीच जादू दाखवली आहे.
‘१९७७ सीबीएस सीरिज डेल्वेचियो’ मध्ये ते महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसून आले होते. यामध्ये जुड हिर्श मुख्य भूमिकेत होते. तसेच ‘लेट मॅन लिव’, ‘ओवररुल्ड आणि द ट्रायल ऑफ ल्यूकुलस’ सारख्या अनेक नाटकांच्या दिग्दर्शनाची धुरा देखील त्यांनी सांभाळली होती. तसेच पाल्टरने डे बाय डे , चार्लीज एंजल्स, बरेटा , द वर्जिनियन, कोलंबो, द हाई चैपरल, गनस्मोक, मिशन: इम्पॉसिबल, द सिक्स मिलियन डॉलर मैन, कोजक आणि द सहित अशा सीरियलमध्ये काम केले आहे. ल्यू पाल्टर यांच्या पश्चात मुलगी आणि सैम, टेसा, मिरांडा आणि नातवंडे असा परिवार आहे.