Download App

‘लाईक आणि सबस्क्राईब’च्या टिझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता, 18 ऑक्टोबरला चित्रपट होणार रिलीज

लाईक आणि सबस्क्राईबच्या प्रदर्शित झालेल्या टीझरने प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केलेत. याची उत्तरे येत्या 18 ऑक्टोबरला मिळणार.

  • Written By: Last Updated:

Like and Subscribe Teaser : काही दिवसांपूर्वीच ‘लाइक आणि सबस्क्राईब’ (Like and Subscribe)या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यात अमृता खानविलकर (Amrita Khanwilkar), जुई भागवत आणि अमेय वाघ (Amey Wagh) यांचा एक सेल्फी होता. ज्यात सेल्फी आणि प्रत्यक्षातील चेहऱ्यावरील हावभाव खूप वेगळे होते. त्यामुळं यामागे काय रहस्य दडले आहे, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरने प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केलेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या 18 ऑक्टोबरला प्रेक्षकांना मिळणार आहेत.

संशोधनासाठी रुग्णालयाला देहदान; सीताराम येचुरी यांच्या कुटुंबाचा मोठा निर्णय 

नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन एलएलपी आणि अभिषेक मेरुकर प्रॉडक्शन यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन वैद्य, अभिषेक मेरुकर हे निर्माते आहे. तर लाईक आणि सबस्क्राईबचे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केलं. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Sangola Constituency: शहाजीबापूंसाठी यंदाही एकदम ओके नाहीच; ‘लाल वादळ’ घेरणार 

एकंदरच या चित्रपटाचा टीझर अंगावर शहारा आणणारा आहे. टीझरमध्ये जुई भागवत एका व्लॉगरच्या भूमिकेत दिसत असून ती एका मोठ्या संकटात अडकल्याचेही दिसतेय. तर दुसरीकडे अमृता खानविलकरही पोलिसांच्या मदतीने कशाचा तरी शोध घेत आहे. त्यामुळं या सगळ्याचा परस्परांशी काही संबंध आहे का? डेड बॉडी प्रकऱण काय आहे? कोणी कोणाचा खून केला? अमृता खानविकर कोणता पुरावा शोधत आहेत, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘लाईक आणि सबस्क्राईब’ पाहून मिळणार आहत.

चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक मेरुकर सांगतात, आजकाल लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो हे सगळे सोशल मीडियावरील शब्द दैनंदिन वापरातील झाले आहेत. या सगळ्या भोवती फिरणाही ही रहस्यमयी कथा आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चाला खिळवून ठेवे. प्रत्येक सीन कथेला एका वेगळ्याच वळणारव घेऊन जाणार आह. रोहित चौहान, डेड बॉडी, पोलीस तपास या सगळ्याचा उलगडा आता लवकरच होणार आहे. येत्या 18 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

तर निर्माते नितीन वैद्य म्हणतात, मराठी चित्रपटांमध्ये आजकाल अनेक नवनवीन विषय हाताळले जात आहे. हा देखील एक वेगळा विषय आहे. चित्रपटातील कलाकार, संगीत टीम, दिग्दर्शन, तंत्रज्ञ अशा सगळ्याच गोष्टी खूप उत्तम जुळून आल्या आहेत. हा चित्रपट खरंतर कौटुंबिक चित्रपट आहे. मात्र तरुणाईची पसंती मिळवण्यात लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

follow us