Sangola Constituency: शहाजीबापूंसाठी यंदाही एकदम ओके नाहीच; ‘लाल वादळ’ घेरणार

  • Written By: Published:
Sangola Constituency: शहाजीबापूंसाठी यंदाही एकदम ओके नाहीच; ‘लाल वादळ’ घेरणार

Maharashtra Assembly Elections 2024; Sangola constituency:”काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल… सगळं कसं एकदम ओके आहे.” या एकाच लाईनवर सांगोल्याचे (Sangola constituency) आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) अख्खा देशात फेमस झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडावेळी गुवाहटीला गेलेल्या बापुंचे सगळे ओके होते. पण आता विधानसभा निवडणुकीत बापुंचे काही ओके दिसत नाही. गतवेळी अवघ्या 768 मतांनी जिंकलेल्या बापूंना मतदारसंघात यंदाही ‘लाल वादळा’चे तर आव्हान असणार आहेच. पण महायुतीतही बापूंसाठी तगडी फाईट आहे. नेमकी ही फाईट कशी आहे आणि शेकाप यंदा बालेकिल्ल्यात कशी ताकद लावणार? पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या आपल्या निवडणूक स्पेशल सिरिजमधून…

माझ्या कार्यकर्त्यांना हात लावाल तर ते हात तोडल्याशिवाय राहणार नाही; भाग्यश्री आत्रामांचा इशारा

1962 या पहिल्या निवडणुकीपासून 1972 आणि 1995 चे दोन अपवाद वगळता 2019 पर्यंत सांगोला मतदारसंघावर गणपतराव देशमुख यांचाच दबदबा होता. 1972 मध्ये काँग्रेसच्या काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी आणि 1995 मध्ये काँग्रेसच्या शहाजीबापू पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. इतर सर्व निवडणुकांमध्ये गणपत आबांनीच शेकापचे लाल झेंडा कायमच फडकवत ठेवला. तब्बल अकरा वेळा निवडून येणे हा त्यांचा एक विक्रमच आहे.

आरक्षणाचा ‘मास्टर प्लान’ राहुल गांधींनी फोडताच फडणवीस अ‍ॅक्टिव्ह; म्हणाले, अमेरिकेतून…

सांगोल्यामधील गत तीन निवडणुकांची माहिती बघितल्यास 2009 च्या निवडणुकीत गणपत आबांनी शहाजीबापू पाटील यांचा सहज पराभव केला. शहाजीबापू हे काँग्रेसकडून मैदानात होते. त्यांना 76 हजार 744 मते मिळाली होती. तर देशमुखांना 86 हजार 548 मते मिळाली होती. 2014 मध्ये शहाजीबापू यांनी पक्ष बदलला आणि शिवसेनेचा भगवा घेतला. 2014 लाही शहाजीबापू यांचा देशमुख यांनी पराभव केला. देशमुख यांना 94 हजार 374 मते मिळाली होती. तर शहाजीबापू यांना 69 हजार 150 मते मिळाली होती.

पण 2019 च्या विधानसभेपूर्वी गणपत आबांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर त्यांनी नातू डॉ. अनिकेत यांना राजकारणात आणले आणि तिकीटही मिळवून दिले. अनिकेत यांनी शिवसेनाच्या शहाजीबापूंना टफ फाईट दिली. याचा फायदा झाला आणि पाटील यांनी डॉ. अनिकेत देशमुखांचा(Aniket Deshmukh) अवघ्या 768 मतांनी पराभव करत शेकापचा गड ढासळवला.

आता यंदाची निवडणूकही बापूंसाठी फार सोपी आहे, असे नाही. लोकसभेला सांगोला मतदारसंघ माढा मतदारसंघात येतो. यावेळी इथून भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना चार हजार 482 मतांचे मताधिक्य मिळाले. पण आमदार शहाजीबापू पाटील आणि दीपकआबा साळुंखे असे दोन नेते असताना निंबाळकर यांना म्हणावे तसे मताधिक्य मिळू शकलेले नाही. निंबाळकर यांनी या मतदारसंघात पाणीपुरवठ्याचे अनेक प्रकल्प मार्गी लावले होते. त्यानंतरही त्यांन इथून निंबाळकरांना मताधिक्य मिळाले नाही. महायुतीसाठी ही चिंतेची बाब आहे.

शहाजीबापूंसमोर दुसरे आव्हान आहे ते महायुतीचेच. यंदा हा मतदारसंघ अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मागत आहे. येथून जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे यांनी जोरदार तयारी सुरू केलीय. त्यांना अजित पवारांचा फुल सपोर्ट आहे. महायुतीत घटक पक्ष जागा मागत असल्याने शहाजीबापूंसमोर तिकीटासाठी अडचणी वाढू लागल्या आहेत.

दुसरीकडे शेकाप हा महाविकास आघाडीत आहे. शेकापकडून डॉ. अनिकेत देशमुख आणि त्यांचे चुलत बंधू बाबासाहेब देशमुख हे दोघे तयारी करत आहे. मागील निवडणुकीच्या पराभवानंतर अनिकेत देशमुख हे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी गेले होते. त्यामुळे त्यांचा मतदारसंघात जनसंपर्क तुटला होता. तर बाबासाहेब देशमुख यांनी बाजार समिती, खरेदी विक्री संघ बिनविरोध करत ते अॅक्टिव्ह राहिले आहे. परंतु या दोघांमध्ये उमेदवारी कुणाला याचा डोकेदुखी मात्र शेकापसमोर राहणार आहे. लोकसभेला अनिकेत देशमुख यांनी राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते यांना दोन्ही देशमुख भावांनी मदत केली होती. पण शेकापच्या जयंत पाटील यांचा पाठिंबा बाबासाहेब यांना असू शकतो.

त्याचवेळी विधानपरिषद निवडणुकीत ठाकरे गटाने शेकापचे नेते जयंत पाटील यांनी मदत केली नाही. ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देत निवडून आणले. त्यामुळे शेकापचा करेक्ट कार्यक्रम ठाकरेंनी केलाच. पण आता हा मतदारसंघ शिवसेनेकडून मागितला जात आहे. याशिवाय ही जागा शेकापला गेल्यास शिवसेनेची मदत घ्यावी लागणार आहे तर शिवसेनेला गेल्यास शेकापची मदत लागणार आहे. त्यामुळे ही जागा कोणाला जाते हा प्रश्न महाविकास आघाडीमध्ये तयार झालाय. दोन्ही आघाड्यांची तयारी पाहता येथे तिरंगी, चौरंगी लढत होऊ शकते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube