माझ्या कार्यकर्त्यांना हात लावाल तर ते हात तोडल्याशिवाय राहणार नाही; भाग्यश्री आत्रामांचा इशारा
Bhagyashree Atram : गडचिरोली मतदारसंघातील अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांच्या घरात अखेर फूट पडली. आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम (Bhagyashree Atram) यांनी आज शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
अखेर भाग्यश्री आत्रामांचा शरद पवार गटात प्रवेश, अहेरीत बाप-लेकीतचं होणार सामना…
धर्मरावबाबा आत्राम यांनी जी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल, मुलीला नदीत टाकेन, अशी धमकी दिली होती. दरम्यान, बापाच्या धमकीला न घाबरता भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. भाग्यश्री यांचा आज (12 सप्टेंबर) शरद पवार गटात प्रवेश झाला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख, आमदार भुसारा, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आदी उपस्थित होते.
रुतलेली चाकं पळाली! नऊ वर्षांत पहिल्यांदाच एसटी बस सुसाट, ऑगस्टमध्ये 16 कोटींपेक्षा अधिक नफा
यावेळी बोलताना भाग्यश्री म्हणाल्या की, मी शांत आहे, ते बरे आहे, नाहीतर मला देखील दहा हात आहेत, हे लक्षात ठेवा. तुमच्याकडे दुधारी तलवार आहे, असे तुम्ही म्हणत असाल तर मी देखील दुर्गा आणि चंडीचा अवतार आहे, असा इशारा भाग्यश्री यांनी धर्मरावबाबा आत्राम यांना दिला.
पुढं त्या म्हणाल्या की, आगामी काळात नवरात्र आहे. त्यामुळे मला आगामी काळात चंडी आणि दुर्गा बनण्याची संधी देऊ नका. मी जेवढी शांत आहे, तेवढी मला शांतच राहू द्या.. मला आक्रमक होण्याची संधी देऊ नका, आगामी काळात मैदानही आमचेच असेल आणि तिथं चौकार, षटकार देखील आम्हीच लगावणार, असंही भाग्यश्री यांनी म्हटलं.
धर्मरावबाबा शेर असतील तर त्यांची मुलगी देखील शेरनी आहे. आणि शेरनी जास्त घातक असते, हे लक्षात ठेवा. माझ्या कार्यकर्त्यांना कोणी धमकी दिली, हात लावला तर ते हात तोडल्याशिवाय मी राहणार नाही, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
पवारांनी आमचे घर फोडलेलं नाही…
मी घर फोडून बाहेर पडले नाही, तर घर फोडून अजित पवार बाहेर पडले. अजित पवारांनी आधी हे मान्य करावे, असं त्या म्हणाल्या. शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा माझा निर्णय आहे. शरद पवारांनी आमचे घर फोडलेलं नाही. पक्षात घेण्यासाठी मीच त्यांची तिनदा भेट घेतली, असं भाग्यश्री आत्राम यांनी सांगितले.
धर्मरावबाबा आत्राम माझे वडील, मी आशीर्वाद...
भाग्यश्री आत्राम म्हणाल्या, धर्मरावबाबा आत्राम माझे वडील आहेत, मी आशीर्वाद घेईन. मागच्या सभेत मला नदीत ढकलून देण्याची भाषा केली. ते चुकीचं होतं. अजितदादा मंचावर होते, महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या, तरीही बोलले, असं त्या म्हणाल्या.