अखेर भाग्यश्री आत्रामांचा शरद पवार गटात प्रवेश, अहेरीत बाप-लेकीतचं होणार सामना…

  • Written By: Published:
अखेर भाग्यश्री आत्रामांचा शरद पवार गटात प्रवेश, अहेरीत बाप-लेकीतचं होणार सामना…

Bhagyashree Atram Join Sharad Pawar Group : गेल्या महिनाभरापासून मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम (Bhagyashree Atram) ह्या शरद पवार गटाते प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती.  अखेर त्यांनी आज शरद पवार गटात प्रवेश करून तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला. यावेळी भाग्यश्री यांनी वडील धर्मरावबाबा आत्राम यांना थेट इशाराच दिला.

रुतलेली चाकं पळाली! नऊ वर्षांत पहिल्यांदाच एसटी बस सुसाट, ऑगस्टमध्ये 16 कोटींपेक्षा अधिक नफा 

धर्मरावबाबा आत्राम यांनी जी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल, मुलीला नदीत टाकेन, अशी धमकी दिली होती. दरम्यान, बापाच्या धमकीला न घाबरता भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. भाग्यश्री यांचा आज (12 सप्टेंबर) शरद पवार गटात प्रवेश झाला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख, आमदार भुसारा, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, गडचिरोली जिल्हाध्यक्ष पवार आदी उपस्थित होते.

आरक्षणाचा ‘मास्टर प्लान’ राहुल गांधींनी फोडताच फडणवीस अ‍ॅक्टिव्ह; म्हणाले, अमेरिकेतून…

यावेळी बोलतांना भाग्यश्री म्हणाल्या, निसर्ग कोपला अन्यथा अधिक मोठा कार्यक्रम केला असता. या भागात विकास झालेला नाही, रस्ते नाहीत, पूर येतोय, काम करणाऱ्यांचे पाय ओढले जातात. या समस्या सुटाव्या यासाठी पक्षप्रवेश केला. आदिवासींच्या विकासासाठी सरकारकडून पैसा येतो, तो पूर्णपणे खर्च होत नाही, असं त्या म्हणाल्या.

पुढं त्या म्हणाल्या, धर्मरावबाबा आत्राम माझे वडील आहेत, मी आशीर्वाद घेईन. मागच्या सभेत मला नदीत ढकलून देण्याची भाषा केली. ते चुकीचं होतं. अजितदादा मंचावर होते, महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या, तरीही ते बोलले. मी घर फोडून जात नाहीये. धर्मरावबाबा नक्षल तावडीत होते, तेव्हा शरद पवारांनी मध्यस्थी केली होती. मी त्यांच्या उपकाराची परतफेड केली, असं आत्राम म्हणाल्या.

आरक्षणाचा ‘मास्टर प्लान’ राहुल गांधींनी फोडताच फडणवीस अ‍ॅक्टिव्ह; म्हणाले, अमेरिकेतून… 

त्या म्हणाल्या, 2019 मध्ये बाबा भाजपच्या वाटेवर असतांना अजितदादांनीच मला बी फॉर्म दिला आणि घर फोडून उभेर राहा, असं म्हटलं. याला जयंत पाटील साक्षीदार आहेत.

जयंत पाटील काय म्हणाले?
दरम्यान, भाग्यश्री आत्राम या कधीच भाजपच्या वळचणीला बसल्या नाहीत. त्यांनी अनेकदा भेट देऊन शरद पवार आणि आम्हाला सांगितले की, मला तिकडे राहायचे नाही. आम्हीच त्यांना वडिलांसोबत राहण्यास सांगिलतं. मात्र, आता त्यांनी सांगितले की मी तिकडे राहू शकत नाही, तेव्हा आम्ही होकार दिला, असं पाटील म्हणाले.

अहेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला होता, त्यामुळे हा मतदारसंघ आघाडीत शरदचंद्र पवार पक्षाकडेच राहावा, यासाठी प्रयत्न करू. आणि तुतारी चिन्हावरच आपल्याला उमदेवार निवडून द्यायचा आहे, असं सांगत भाग्यश्री आत्राम यांच्या उमेदवारीचे संकेत दिले.

धर्मरावबाबा आत्राम हे अहेरी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. ते 1999, 2004 आणि 2019 मध्ये निवडून आले होते. सध्या ते  महायुती  सरकारमध्ये मंत्री आहेत. मात्र, भाग्यश्री ह्या वडिलांच्या विरोधातच निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्रामांसह अजितदादांचे टेन्शन वाढले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube