लाडक्या बहिणींचा कौल नेमका कोणाला? निवडणुकीत महिला मतदारांची टक्केवारी वाढली, आकडेवारी समोर
Ladki Bahin Yojana Impact On Maharashtra Assembly Elections : राज्यात काल झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2024) मतदानात 65.11 टक्के टक्केवारी नोंदवली गेली आहे.हाती आलेल्या आकडेवारीनुसार, ही टक्केवारी मागील निवडणुकीपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. लोकसभा निवडणुकीत झटका बसल्यानंतर महायुती सरकारने लाडक्या बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) घोषणा करत अंमलबजावणी देखील सुरू केली.
या विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ हा चर्चेचा विषय होता. सत्ताधारी अन् विरोधकांनी या योजनेला प्रचाराचं भांडवल देखील बनवलं होतं. त्यामुळे या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला का? हा सवाल उपस्थित होतोय. तर विदर्भामध्ये सरासरी 58 ते 60 टक्के मतदान झाल्याचं समोर आलंय. यामध्ये महिलाचा सहभाग उल्लेखनीय होता.
महाराष्ट्रात 30 वर्षांचा विक्रम मोडीत,1995 मध्ये झाले होते बंपर मतदान; मनोहर जोशी झाले होते CM
त्यामुळे आता या महिलांच्या वाढत्या सहभागाचा फायदा नेमका कोणाला होणार? हा प्रश्न देखील उपस्थित होतोय. ही योजना महिलांना विशेष सवलती आणि सुविधांचं आश्वासन देतं आहे. त्यामुळे महिला मतदारांचं लक्ष वेधलं गेलंय. महिला मतदारांच्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा नेमका महायुती होणार की महाविकास आघाडीला हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. परंतु महिलांची वाढती टक्केवारी विधानसभा निवडणूकीच्या निकालावर परिणाम करणार हे मात्र नक्की आहे.
गौतम अदानींच्या अडचणीत वाढ; यूएसमध्ये लाचखोरी आणि फसवणूकीचे आरोप, अटक वॉरंट जारी
बुलढाणा जिल्ह्यात 70.32 टक्के मतदान झालंय. जिल्ह्यातील 7,13,191 महिलांनी मतदान केलंय. 2019 च्या तुलनेत यावेळी महिलांचा मतदान टक्का वाढला आहे. साधारण 9 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांनी यंदा मतदान केलंय. 2019 मध्ये महिलांचे मतदान 56.06 टक्के, तर 2024 मध्ये महिलांचे मतदान 66.96 टक्के होते. महिलांच्या मतदानात यंदा 9.33 टक्क्यांनी वाढ झाल्याचं सांगितलं जातंय. पश्चिम महाराष्ट्रात मतदानाचा टक्का 70 टक्क्यांहून अधिक असून महिलांचा उत्साह लक्षवेधी पाहायला मिळाला.