Assembly Election: रविंद्र चव्हाण पालकमंत्री झाले आणि पालघरचे भाग्य खरंच उजळले का ?

  • Written By: Published:
Assembly Election: रविंद्र चव्हाण पालकमंत्री झाले आणि पालघरचे भाग्य खरंच उजळले का ?

Assembly Election : गडचिरोली, नंदुरबारप्रमाणेच पालघर (Palghar) हा आदिवासी बहुल जिल्हा. 2014 मध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्यात जव्हार, तलासरी, मोखाडा, डहाणू हे चार तालुके शंभर टक्के आदिवासीबहुल आहेत. तर पालघर, वसई, वाडा आणि विक्रमगड ह्या तालुक्यांत आदिवासी आणि बिगर आदिवासी अशी संमिश्र लोकसंख्या आहे. त्यामुळे दोन्ही वेगवेगळे भाग आणि तेथील प्रश्नही वेगळे. काही प्रश्न सुटलेले तर काही प्रश्न तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेले. महाविकास आघाडीच्या सत्ता गेल्यानंतर भाजपचे रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे सार्वजनिक बांधकामंत्री झाले. त्यांच्याकडे सिंधुदुर्ग आणि पालघरचे पालकमंत्रिपदाची जबाबदारी आली. त्यांनी पालघरमध्ये विकासकामे केली का ? आदिवासींसाठी काय कामे केली हेच हे पाहुया.


तब्बल 6 हजार 838 किलोमीटर रस्ते

सार्वजनिक बांधकाममंत्री आणि त्यात पालकमंत्री यातून पालघरचा विकास करता येईल, याचा विचार करत चव्हाण यांनी रस्त्यांची विकास करून आदिवासी समाजासाठी चांगल्या दर्जाची सुविधा कशा निर्माण करता येईल, याचा विचार केला. त्यातून मजबूत रस्ते तयार करण्यास सुरुवात करण्यात आली. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेतून तब्बल पाच हजार कोटींच्या निधीची तरतूद केली. केवळ तरतूद न करता निधी मिळवत रस्ते तयार करण्यास सुरुवात केली. त्यातून तब्बल 6 हजार 838 किलोमीटर रस्ते बांधले जात आहे. अतिवृष्टीमुळे आदिवासी तालुक्यांमधील आठमाही रस्ते होते. आता रस्ते बारमाही करण्यात येत आहेत. आदिवासी समाजाला आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा मिळविण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र सुविधा आश्रमाशाळांना जोडणारे रस्त्यांची निर्मिती केली. त्यातून आदिवासींचे जीवन सुकर झाले.


Dombivli Assembly Constituency: ‘डोंबिवली फर्स्ट’म्हणणारे रविंद्र चव्हाण विजयाचा चौकार मारणार ?


आदिवासी शाळा उभारण्यावर भर

आदिवासी भाग असल्याने पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळांची दुरावस्था झाली होती. आदिवासी समाजाचा विकास घडवायचा असेल तर पुढील पिढीला शिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी या भागातील आश्रमशाळांच्या रंगरंगोटी, डागडुजी आणि पुनर्बांधणी वर भर दिला. त्यातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणाऱ्या आश्रमशाळा निर्माण केल्या.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू आणि जव्हार या दोन कार्यालयातंर्गत येणाऱ्या 35 शासकीय आश्रमशाळांची दुरुस्ती करण्यात आली. आदिवासी विद्यार्थ्यांना गरम पाण्याची सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अशा विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्यात. त्यातून विद्यार्थ्यांना सुंदर, अत्याधुनिक, अद्ययावत भौतिक सुविधांनी युक्त अशा शाळांमध्ये शिक्षण घेता येत आहे. तर काही आश्रमशाळांमध्ये आरओ वॉटर मशीन बसविण्यात आले. त्यातून विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहत आहे. त्याचबरोबर ते शिक्षणात प्रगती होतेय. आपल्या पुढील पिढीतील मुलं शिक्षण घेत आहेत, हे बघून आदिवासी समाजात आनंदाचं वातावरण पसरलं आहे.


पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वाढवण बंदर

पालघरमध्ये देशातील सर्वात मोठे बंदर उभारण्यात येत आहे. त्यासाठी 76 हजार 200 कोटींचा निधी मिळाला आहे. पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता ग्रीनफिल्ड कॉरिडॉर म्हणून वाढवण बंदर उभारण्यात येत आहे. हे बंधर आधुनिक तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांनी सुसज्ज असणार आहे. यामुळे देशाच्या आयात-निर्यातीला गती मिळणार आहे. त्यामुळे या बंदराचा विकास झाल्यानंतर दहा ते बारा लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे.

रस्ता आणि पुलाचे बांधकाम

याचबरोबर मतदारसंघातील अनेक रस्त्यांचे, पुलांचे कामे करण्यात आली. पर्यटन विकासतंर्गत वसईतील तुंगार चौकी ते तुंगारेश्वर महादेव मंदिर रस्ता व लहान पूल, वसईतील भिनार-अंबोडे-वडघर मेढे येथे लहान पूल उभारण्यात आले. विक्रमगड, मोखाडा, तलासरी या तालुक्यात अनेक रस्ते, पूल उभारण्यात आले. तर अनेक भागांत क्राँक्रिट बंधारे उभारण्यात आली.

तलासरी तालुक्यातील घिमानिया, विक्रमगड तालुक्यातील डोल्हारी बुद्रुक आणि वाडा तालुक्यातील गुंज या गावांमध्ये असणाऱ्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे चव्हाण यांच्या माध्यमातून बांधकाम करण्यात आले. त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आरोग्य सुविधा पोहोचू लागल्या. रस्ते, पूल, प्राथमिक आरोग्यकेंद्र, आश्रमशाळा असा सर्वांगीण विकासाचे अनेक कामे रविंद्र चव्हाण यांच्याकडून झालेत आहे. या कामाच्या जोरावर भाजपला आदिवासी भागात जनाधार ही मिळू लागला हे दिसून येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube