श्रीरामपूरमध्ये निवडणुकीत भाजपचे बिहाणी चर्चेत, जाणून घ्या काय आहे कारण?
नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी करणाऱ्या श्रीनिवास बिहाणी यांचीच सध्या श्रीरामपूर शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Election) शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांनी प्रचारयंत्रणा सज्ज केली असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नेतेमंडळींनी रात्रंदिवस धावपळ सुरू केली आहे. यातच श्रीरामपुरात सध्या एक नाव चांगलेच चर्चेत आहे ते म्हणजे महायुतीचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांचे होय.
नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी करणाऱ्या श्रीनिवास बिहाणी यांचीच सध्या शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. बिहाणी गेल्या दोन दशकांपासून राजकारण व समाजकारणात सक्रीय आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात महायुतीला विधानसभेला पोषक वातावरण होते आता त्यांनतर होणाऱ्या या निवडणुकीत देखील जनतेकडून बिहाणी यांच्या उमेदवारीला पसंती मिळत असल्याचे चित्र समोर येत आहे.
बिहाणी नेमके आहेत तरी कोण? जाणून घ्या
बिहाणी गेल्या दोन दशकांपासून राजकारण व समाजकारणात सक्रीय आहेत. श्रीरामपूरमधील आरबीएनबी महाविद्यालयात त्यांचे बीएस्सी पर्यंत शिक्षण झाले. शहरातील एक प्रतिष्ठीत व्यापारी म्हणून ते परिचीत आहेत. यापूर्वी त्यांनी श्रीरामपूर पालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून मिळालेली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांच्या उपनगराध्यक्षपदाचा कार्यकाळ अजूनही श्रीरामपूरकर विसरले नाहीत. त्यामुळे यावेळीही त्यांचे पारडे जड आहे. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने बिहाणी नगराध्यक्ष झाले, तर श्रीरामपूरला निधी कमी पडणार नाही, हेही तितकेच खरे.
काँग्रेसचा बालेकिल्ल्याला विखेंनी लावले सुरुंग
श्रीरामपूर नगरपलिकेचे माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, माजी नगरसेवक शशांक रासकर, आशिष धनवटे आदींसह काँग्रेसच्या सुमारे 100 हून अधिक जणांनी मुंबई येथे जावून भाजपात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे श्रीरामपुरात काँग्रेसला मोठे खिंडार पडले. दरम्यान अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात हा प्रवेेश सोहळा पार पडला.
विखे श्रीरामपुरात ताकद दाखवून देणार
श्रीरामपूरच्या विकासासाठी काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या बिहाणी यांना थेट नगरध्यक्षपदाचे उमेदवारी देण्यात आली. श्रीरामपूर शहरातील काँग्रेसचा मोठा गट फोडण्यात विखे यांना यश आले आहे. या प्रवेशामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या श्रीरामपूरमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. दरम्यान महायुतीची सत्ता असलेल्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदार संघात नगराध्यक्षपद भाजपाकडे यावे यासाठी मंत्री विखेंसह माजी खासदार सुजय विखे हे देखील प्रयत्नशील आहे.
