पालघरमध्ये मंत्री रविंद्र चव्हाणांची खेळी; अनेक जण पक्षात घेत भाजपची ताकद वाढवली !
Dahanu Assembly Constituency : पालघर जिल्ह्यातील डहाणू मतदारसंघामध्ये (Dahanu Assembly Constituency) महाविकास आघाडीने मित्र पक्ष माकपला जागा सोडलीय. माकपने येथून विद्यमान आमदार विनोद निकोले यांना पुन्हा रिंगणात उतरविले आहे. त्यांच्याविरोधात भाजपने विनोद मेढा या निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट दिले आहे. त्यांनी निकोले यांच्याविरोधात मोठे आव्हान निर्माण केले आहेत. त्यात आता पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी हे पक्षात घेत भाजपची (Bjp) ताकद वाढविली आहे.
Dombivli Assembly Constituency: ‘डोंबिवली फर्स्ट’म्हणणारे रविंद्र चव्हाण विजयाचा चौकार मारणार ?
डहाणू येथे सारणी, ऐना आणि बणई चंदूनगर या ग्रामपंचायत सदस्यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशामुळे भाजपाला पालघर जिल्ह्यात बळ मिळाले आहे. यावेळी सर्व सदस्यांचे स्वागत केले आणि उपस्थित कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प केला. यावेळी समस्त डहाणूकरांनी मिळून डहाणू विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विनोद मेढा यांचाच विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला.सारणी गावच्या सरपंच नंदिनी डंगला, रविंद्र कोरडा, प्रकाश पाचळकर, दिनेश सोमन, संतोष भगली, राहुल गुहे, कैलास सोमन, भावेश धांगडा, अंकुश लाडवी, राहुल वावरे यांच्यासह 25 कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
तसेच ऐना ग्रामपंचायतीतील सुनिल कडू, अशोक बोस, श्वेता देसले आणि बणई चंदूनगर ग्रामपंचायतीच्या तीस सदस्यांनी भाजपा परिवारामध्ये प्रवेश केला. यावेळी डहाणू विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विनोद मेढा, खासदार डॉ. हेमंत सवरा, भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, पालघर लोकसभा मतदारसंघ समन्वयक राणीताई द्विवेदी तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.