उद्धव ठाकरे देवमाणूस, पण शिंदेंना पाठिंबा दिल्यानेच…; श्रीनिवास वनगा यांचे सूर बदलले
Shriniwas Vanaga : श्रीनिवास वनगा (Shriniwas Vanaga) यांचे शिंदे गटाने तिकीट कापल्यानंतर ते नाराज झाले होते. मागच्या चार दिवसांपासून वनगा घरातून बेपत्ता झाले होते. त्यामुळं त्यांचे कुटुंबिय आणि शिवसैनिक अस्वस्थ झाले होते. अखेर दोन दिवसांनी वनगा आता घरी परतले. ते कुठे गेले होत? का गेले होते? याची कारणे त्यांनी दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देवमाणूस आहेत, पण शिंदेंना पाठिंबा दिल्यानेच माझ्या मतदारसंघात 1200 कोटी रुपयांचा निधी आणू शकलो, असं वनगा म्हणाले.
काँग्रेसला डबल धक्का! रवी राजांनंतर विद्यमान आमदाराचाही पक्षाला रामराम; शिवसेनेत प्रवेश
शिंदे गटाने त्यांना पालघरमधून वनगा यांना उमेदवारी देण्यास नकार दिला होता. त्यानंतर वनगा अज्ञातस्थळी गेले होते. चार दिवस बेपत्ता राहिल्यानंतर ते परतले. आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, मी दोन दिवस बाहेर होतो. मी नातेवाईकांकडे होतो. घराच्या आसपासच होतो. मला अपेक्षा होती पालघर किंवा डहाणूतून मला उमेदवारी मिळेल. मी नाराज होतो. त्याच भावनेतून मी बोललो. पण, मी ठाकरे गटाच्या संपर्कात नव्हतो. रागाच्या भरात मी नातेवाईंकाकडे गेलो होती, असं वनगा यांनी सांगितलं.
भारत- चीनमधील तणाव संपला! दिवाळीनिमित्त दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांना दिली मिठाई
वनगा आता उद्धव ठाकरेंची भेट घेणार का? असा सवाल केला असता ते म्हणाले की, सध्यातरी माझी उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा नाही. आज मी कोणत्याही पार्टीत जाण्याच्या मनस्थितीत नाही. उद्धव ठाकरे हे देवमाणूस आहेत. पण, एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिल्यानेच मी माझ्या मतदारसंघात 1200 कोटी रुपयांचा निधी आणू शकलो, असं वनगा म्हणाले.
बेपत्ता होण्यापूर्वी वनगा यांनी एकनाथ शिंदे यांनी माझा घात केल्याचं विधान केलं होतं. याविषयी त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी नाही तर त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी माझा घात केला. एकनाथ शिंदे यांची दिशाभूल करण्यात आली. जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, राजेंद्र गावित यांनी माझा बळी घेतला. या लोकांनी माझे तिकीट रद्द करण्याचा कट रचला. मी प्रामाणिक होतो. माझा बळी घेणाऱ्यांवर शिंदे साहेबांनी कारवाई करावी, हीच माझी अपेक्षा आहे. शिंदे साहेब जे सांगतिल ते मी करेल, असं वनगा म्हणाले.
कालपासून माझ्या मुलाची तब्येत बरी नाही. माझी आई पण आजारी आहे. मला माझ्या कुटुंबासाठी जगायचे आहे. त्यामुळे मी शांत राहून पुढची भूमिका घेईल असं वनगा म्हणाले.