भारत- चीनमधील तणाव संपला! दिवाळीनिमित्त दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांना दिली मिठाई

भारत- चीनमधील तणाव संपला!  दिवाळीनिमित्त दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांना दिली मिठाई

वंजारी समाज माझ्यासोबत, पंकजा मुंडेंनी राजळेंचा प्रचार केला तरीही फरक पडणार नाही…; हर्षदा काकडेंना विश्वासIndian Chinese Troops Exchange Sweets At Border Points : डेमचोक-डेपसांग येथून चीन-भारतीय सैन्याने माघार (India China Boarder Issue) घेतली. आज किंवा उद्यापासून दोन्ही देशांचे सैन्य येथे गस्त घालण्यास सुरुवात करणार आहेत. त्याचबरोबर आज दिवाळीनिमित्त दोन्ही देशांच्या (भारत-चीन) सैनिकांनी एकमेकांचे स्वागत केले (Diwali) आहे. अलीकडेच भारत आणि चीन यांच्यात डेपसांग आणि डेमचोकमधून वेगळे होण्याबाबत करार झाला.

पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोकमध्येच नव्हे, तर इतर ठिकाणी देखील मिठाईचं वाटप करण्यात आलंय. जिथे मिठाई वाटली गेली आहे, तिथे लडाखमधील चुशुल मोल्डो, सिक्कीममधील (Indian Chinese Troops Exchange Sweets) नाथुला, अरुणाचलमधील बुमला आणि इतर अनेक ठिकाणांचाही समावेश आहे. पाच बीएमपी पॉइंट्सवर मिठाईची देवाणघेवाण झाल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं की, बुधवारी डेपसांग आणि डेमचोकमध्ये विघटन करण्याचे काम पूर्ण झालंय. यानंतर गस्तीबाबत स्थानिक कमांडर स्तरावर चर्चा झाली. बहुधा आज किंवा उद्यापासून दोन्ही देशांचे सैन्य डेपसांग आणि डेमचोक भागात गस्त घालण्यास सुरुवात करतील. गेल्या साडेचार वर्षांपासून तणावामुळे येथे गस्त बंद करण्यात आली होती. यासंदर्भात नुकताच दोन्ही देशांमध्ये करार झाला. हा करार केवळ डेमचोक आणि डेपसांगसाठी करण्यात आला आहे. इतर क्षेत्रांसाठी अद्याप वाटाघाटी सुरू आहेत.

भारत-चीनमध्ये सर्वात लांब सीमा आहे. ही 3488 किमी लांबीची सीमा आहे. जी भारत आणि चीनची सीमा पूर्व, मध्य आणि पश्चिम अशा तीन विभागांमध्ये विभागते. ही सीमा लडाखपासून अरुणाचलपर्यंतच्या अनेक भागांवर भारत आणि चीन वेगवेगळे दावे करतात. त्यामुळे संघर्षाची शक्यता वाढते. मात्र करारानंतर दोन्ही देशांच्या सैन्याने डेपसांग आणि डेमचोकमध्ये माघार घेतली आहे.

भाजपचा उमेदवार पण, चिन्ह धनुष्यबाण अन् घड्याळ; ‘त्या’ मतदारसंघांत खास प्लॅन!

जून 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या भीषण संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंध बिघडले होते. गेल्या काही दशकांतील दोन्ही बाजूंमधील हा सर्वात गंभीर लष्करी संघर्ष होता. अनेक आठवड्यांच्या वाटाघाटीनंतर 21 ऑक्टोबर रोजी कराराला अंतिम रूप देण्यात आले. यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एका निवेदनात म्हटले होते की, भारत आणि चीनचे सैनिक दोन्ही बाजूंमधील लष्करी संघर्ष सुरू होण्यापूर्वी जशी गस्त घालत असत त्याच पद्धतीने गस्त घालू शकतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube