मोठी बातमी! फटाके फोडताना 100 जण जखमी, 32 लहान मुलांचा समावेश
People Injured Due To Bursting Firecrackers In Diwali : देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. परंतु यादरम्यान फटाक्यांमुळे ( firecrackers) काही अपघात झाल्याचं देखील समोर आलंय. फटाक्यांच्या अपघातामुळे डोळ्यांना जखमा होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालीय. बंगळुरू शहरात यंदा फटाक्यांमुळे 220 जण जखमी झाल्याचं समोर (Diwali) आलंय. यामध्ये 120 जणांना डोळ्यांच्या जखमा, तर 100 जण जखमी झाले आहेत. यामध्ये 32 लहान मुलांचाही समावेश आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रूग्णांचं प्रमाण वाढलंय.
तीन दिवसांपासून फटाक्यांमुळे होणाऱ्या अपघाताचं प्रमाण वाढलंय. बंगळुरूमधील मिंटो, नारायण नेत्रालय, शेखर नेत्रायलसोबत अनेक रूग्णालयांमध्ये फटाक्यांच्या अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. फटाके वाजवणाऱ्यांपेक्षा त्यांच्यासोबत उभे राहणारे जखमी झाले आहे. मिंटो रूग्णालयात एकून नऊ रूग्णांची नोंद करण्यात आलीय. तर एकूण 45 जणांवर उपचार देखील करण्यात आलंय.
आज राज्यभरात बंडखोरांची मनधरणी; 3 वाजेपर्यंत अर्ज मागं घेण्याची मुदत, कोणत्या पक्षात काय स्थिती?
फटाक्यांच्या दुर्घटनेमुळे 35 जणांवर उपचार करण्यात आलेत, तर 14 जणांवर उपचार सुरू आहेत. या घटनांमध्ये 32 मुलांच्या डोळ्यांना जखम झालीय. फटाक्यांमुळे अजून 23 जण गंभीर जखमीत. तर 26 जणांना किरकोळ दुखापत झालीय. यापूर्वीच 4 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आलीय. अजून 12 जणांवर शस्त्रक्रिया होणार आहे. दिवाळीत फटाके फोडताना 27 जण गंभीर जखमी झालेत. शनिवारी 24 तासांत 20 फटाक्यांच्या अपघाताची नोंद करण्यात आलीय.
पंचवीस जागा लढविणार; सर्वाधिक मतदारसंघ मराठवाड्यातील; जरांगेंची मोठी घोषणा
शनिवारी फटाक्यांमुळे झालेल्या अपघातात 15 लहान मुले फटाक्यांमुळे जखमी झाली होती. काही मुलांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झालीय, त्यांची दृष्टी जाण्याची भिती वर्तवली जातेय. यामधील आठ मुलांच्या कॉर्नियाचं नुकसान झालंय. दरवर्षी दिवाळीत फटाके फोडताना काळजी घेण्यास सांगितलं जातं. तरीही अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय.