‘अबीर’ नंतर शंभो एंटरटेनमेंट आणि श्री महाकाल प्रॉडक्शन्सची ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ चित्रपटाची घोषणा…

Bhagyashree Mote :  मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविधांगी विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती होत असून, आशयाइतकीच त्यांच्या लक्षवेधी

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Bhagyashree Mote

Bhagyashree Mote :  मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविधांगी विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती होत असून, आशयाइतकीच त्यांच्या लक्षवेधी आणि कुतूहल वाढवणाऱ्या शीर्षकांचीही चर्चा रंगताना दिसते. वेगवेगळ्या विषयांना मनोरंजक शैलीत पडद्यावर आणण्याचा हा प्रयत्न प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी ठरत आहे. याच वाटेवरील आणखी एक वेगळा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज होत आहे. ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ असे उत्कंठावर्धक शीर्षक असलेल्या या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पहिल्या पोस्टरद्वारे करण्यात आली आहे. नावातूनच अनेक प्रश्न उपस्थित करणारे हे शीर्षक चित्रपटाच्या कथानकाबद्दल उत्सुकता निर्माण करणारे आहे.

सुदेश वसंतराव झावरे पाटील आणि अंकिता पानसे-शिंदे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पुंडलिक यशोदा लक्ष्मण धुमाळ करणार आहेत. शंभो एंटरटेनमेंट आणि श्री महाकाल प्रॉडक्शन्स यांचा ‘अबीर’नंतर ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ हा दुसरा चित्रपट आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री भाग्यश्री मोटे या चित्रपटाच्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर असून त्या महत्त्वपूर्ण भूमिकेतही दिसणार आहेत. क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून आकाश विष्णू शिंदे जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक आशयाला विनोदाची खुमासदार फोडणी देत वास्तवातील परिस्थितीवर भाष्य करण्याचा या चित्रपटाचा प्रयत्न असणार आहे.

महाराष्ट्रासमोरील ज्वलंत प्रश्न, त्यातून निर्माण होणारी सामाजिक परिस्थिती आणि सर्वसामान्यांच्या जगण्यातील वास्तव यांचा वेध घेताना मनोरंजनाची कास धरली जाणार आहे. गीत-संगीताचीही सुरेल जोड या चित्रपटाला लाभणार आहे. भाग्यश्री मोटे यांनी मराठी चित्रपटसृष्टीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विविध भूमिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी भाग्यश्री आता या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनयासोबतच क्रिएटिव्ह प्रोड्युसर या नव्या जबाबदारीतूनही प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे तिच्या या दुहेरी भूमिकेविषयी विशेष उत्सुकता आहे.

मोहिते-पाटलांचा स्वाभिमान भीमा नदीत टाकला, पराभवाची सवय लागलीय; जयकुमार गोरेंचा हल्लाबोल-

भाग्यश्री मोटे यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार कलाकारांची तगडी फळी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अनुभवी आणि कुशल तंत्रज्ञांची फळीही चित्रपटाच्या निर्मितीत आपले योगदान देणार आहे. लवकरच चित्रपटातील कलाकार, कथानक आणि अन्य महत्त्वाच्या तपशीलांची घोषणा करण्यात येणार असल्याने या अनोख्या शीर्षकाच्या चित्रपटाकडे आता मराठी चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

follow us

संबंधित बातम्या